• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नुतनीकृत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

by Guhagar News
October 11, 2023
in Ratnagiri
83 1
0
Inauguration of Refurbished Ambulance
163
SHARES
465
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे काम डोंगराएवढे; जिल्हा पो. अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी, ता. 11 : धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाने वाचन चळवळ वाढवली आहे. आता डिजिटल स्वरूपातही ग्रंथालयाने सुविधा द्यावी. ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेने दुर्गम भागातील ७०० रुग्णांचे प्राण वाचवले. हे डोंगराएवढे मोठे काम आहे. ग्रंथालयाचे संस्थापक कै. शंकरराव कुलकर्णी आणि रुग्णवाहिकेचे देणगीदार कै. तात्या अभ्यंकर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले. ८४ गावांचा अधिपती श्री रत्नेश्वराच्या कृपेमुळे हे शक्य झाले. चालकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे, यापुढेही हे काम असेच चालू राहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. Inauguration of Refurbished Ambulance

Inauguration of Refurbished Ambulance

धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या नूतनीकृत व ऑक्सिजन सेवेसह सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण केल्यानंतर श्री. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले की, १९७६ साली दुर्गम गावात ग्रंथालय सुरू झाले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. ग्रंथालय चालवणे कठीण असूनही चालवले जात आहे. अलिकडे वाचन संस्कृती कमी झाली असून त्याचे दुष्परिणाम पाहत आहोत. आता डिजिटल स्वरूपातही ग्रंथालयात सुविधा द्यावी. मोबाईल, सोशल मीडियाचे अॅडिक्शन झाले आहे. परंतु वाचन संस्कृती जपण्याचे काम हे ग्रंथालय करत आहे. Inauguration of Refurbished Ambulance

Inauguration of Refurbished Ambulance

कोकणाबद्दल आदर वाटतो. आपण समाजाला काही दिलं पाहिजे, ही मातीची मानसिकता आहे. आता ऑक्सिजनची सेवा दिली आहे. कोविड काळात ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. तात्या अभ्यंकर यांचाही मुलगा त्यांचा वारसा पुढे चालवत आहे. ८४ गावांचा अधिपती श्री रत्नेश्वराची कृपा या गावावर आहे. वैद्यकशास्त्रात गोल्डन हवर संकल्पना आहे. अपघात, ब्रेन हॅमरेज, अटॅक आल्यास रुग्णाला ठराविक वेळेत उपचार मिळाले तर प्राण वाचवता येऊ शकतात. ग्रामीण भागात रुग्णवाहिका चालक आणि ग्रामस्थांनाही असे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे. तात्या अभ्यंकरांचे द्रष्टेपण होते. त्यामुळेच ही रुग्णवाहिका त्यांनी दिली. तरुण मंडळी निस्वार्थ पद्धतीने काम करत आहेत. मुंबई, डेरवण, कोल्हापूर, कर्नाटक, चिपळूण, संगमेश्वर, हातकणंगले येथेही रुग्णांना नेण्यात आले. हे महत्वाचे काम आहे, असेही पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले. Inauguration of Refurbished Ambulance

Inauguration of Refurbished Ambulance

ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी म्हणाले की, श्री रत्नेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या रवींद्र कुळकर्णी यांनी रुग्णवाहिकेसाठी योगदान देऊ, असे आश्वस्त केले. त्यांनी ऑक्सिजन सुविधेसाठी मदत केली. अतुल तुपे यांनी सर्व देखभाल दुरुस्तीसह गाडीचे पार्टही पुणे, कोल्हापूरमधून आणले. आज तात्यांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद होत आहे. यावेळी (कै.) तात्या अभ्यंकर यांचे सुपुत्र पराग अभ्यंकर यांनी रुग्णवाहिकेसाठी २५ हजार रुपये दिले. Inauguration of Refurbished Ambulance

यावेळी सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान अध्यक्ष श्रीकांत देसाई, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष दत्ताराम चव्हाण, नेवरे सरपंच दीपक फणसे, ओरी सरपंच संकेत देसाई, ग्रंथालयाचे संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुलकर्णी, तंटामुक्त अध्यक्ष दीपक जाधव, मुख्याध्यापक अविनाश जोशी, निवेंडी गावचे सतीश सोबळकर, देणगीदार अतुल तुपे आदी उपस्थित होते. Inauguration of Refurbished Ambulance

देणगीदार व पंचक्रोशीतील सरपंच, संचालक, रुग्णवाहिका चालक आदींचा सन्मान करण्यात आला. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसमवेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिटणीस मुकुंद जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये ग्रंथालय व रुग्णवाहिका संबंधी माहिती दिली. उपाध्यक्ष विलास पांचाळ यांनी आभार मानले. मी व माझ्या कुटुंबियांच्या अपघाताप्रसंगी याच रुग्णवाहिकेमुळे आमचे प्राण वाचू शकले असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले. Inauguration of Refurbished Ambulance

Tags: GuhagarGuhagar NewsInauguration of Refurbished AmbulanceLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.