पाटपन्हाळे विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे धनुर्विद्या स्पर्धेत सुयश
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 10 : चिपळूण तालुक्यातील डेरवण या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय धनुर्विद्या ( अर्चरी ) स्पर्धेत कु. शौर्या मुनिष जैतपाळ हिने सुवर्णपदक संपादन केले आहे. यासाठी सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. Shaurya Jaitpal won the gold medal
कु. शौर्या मुनिष जैतपाळ ही गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थिनी असून १४ वर्षे वयोगटातील ३० मीटर अंतराच्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या (अर्चरी ) स्पर्धेत कु. शौर्या हिने सुयश संपादन केले. सातारा या ठिकाणी होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी सुवर्णपदक पटकावलेल्या कु. शौर्या हिची निवड झाली आहे. तिने बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. Shaurya Jaitpal won the gold medal

धनुर्विद्या खेळाडू कु. शौर्या जैतपाळ हिच्या सुयशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा श्रीम.सुचिताताई वेल्हाळ, सचिव श्री.सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ.आर.आर.सौंदेकर, शिक्षकवृंद तसेच पालकांनी अभिनंदन केले. तसेच सातारा येथे होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Shaurya Jaitpal won the gold medal
