पुणे, ता. 09 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील राज्यांनंतर आता महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरला आहे. कोकण आणि मुंबईतून आठ ते नऊ ऑक्टोबर पर्यंत मान्सून माघारी फिरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हळूहळू थंडीची चाहूल लागल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी शेकोट्याही पेटल्या आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत मान्सून गायब होणार असून कडाक्याची थंडी सक्रिय होणार असल्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात येत आहे. परिणामी सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. Monsoon’s return journey begins
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मान्सून माघारी फिरला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत मुंबई आणि कोकणातूनही मान्सून माघारी फिरणार आहे. त्यामुळं पुढील काही दिवस कोकण आणि मुंबईतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई तसेच कोकण वगळता राज्यातील अन्य भागांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. Monsoon’s return journey begins
दिवाळीपर्यंत महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार असून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. परंतु अद्याप दक्षिण कोकण, गोवा आणि मुंबईतील काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. Monsoon’s return journey begins