संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा व मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा खोडदे गावातून काढण्यात आली व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. Amrit Kalash Yatra at Khodde
यावेळी ग्रामस्थांच्या घरात जाऊन स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले व अमृत कलशामध्ये माती व तांदूळ टाकण्यात आले. गावात ग्रामपंचायत वाडी वस्तीवर व शाळेमध्ये प्रभात फेरी काढून स्वच्छता करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय समोर शहीद जवानांचे शिलाफलकाला अभिवादन करून व हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. Amrit Kalash Yatra at Khodde

यावेळी उपसरपंच कुमारी पूजा गुरव ,सदस्य सौ. तनुजा पवार, श्री. रविंद्र निवाते, श्री.नाना साळवी, श्री.विलास निर्मळ, सौ. शुभांगी डिंगणकर, सौ.सुनंदा निवाते, श्री. विकास मोहिते, संत गाडगेबाबा अध्यक्ष श्री.राजेंद्र साळवी ,उपाध्यक्ष श्री.विलास गुरव ,श्री. सुरेश साळवी, श्री.शरद साळवी, श्री.शानंद पवार, ग्रामसेवक श्री.बाबूराव सूर्यवंशी, श्री. राजेश पवार, श्री.राजेंद्र पवार, शिक्षक श्री.लोणारे , श्री. पागडे ,श्री. चव्हाण , श्री.शिरकर , आशा स्वयंसेविका सौ. रेशमी साळवी, सौ. मधुरा साळवी, सौ. पूजा निवाते, श्रीमती. संपदा कदम, अंगणवाडी सेविका सौ. श्वेता गुरव, सौ साळवी , श्रीमती.आंब्रे, निवाते , सौ.गोरीवले , श्रीमती. प्राची साळवी, सौ. वैदही चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. नितीन मोहिते, श्री.वैभव निवाते आदी. ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. Amrit Kalash Yatra at Khodde
