दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ
गुहागर, ता. 06 : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती सोहळ्याचे बुधवार दि. 4/10/ 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्षस्थानी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय श्री जे के जाधव बापूसाहेब होते. तर प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त प्राध्यापक श्री. डी. ए .माने सर होते. Karmaveer Bhaurao Patil’s birth anniversary at Palshet
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/add.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/10/add.jpg)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या व भाई पालशेतकऱ याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन मा. मुख्याध्यापक श्री जोगळेकर एम.जी. सर व पर्यवेक्षिका सौ ढेरे मॅडम यांनी स्वागत केले. सभेच्या प्रास्ताविकात मा. मुख्याध्यापक श्री जोगळेकर सर यांनी शाळेच्या चढत्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते श्री डी ए माने यांनी कर्मवीरांच्या जातीभेदापलीकडच्या शिक्षण प्रणालीचे आणि कर्मवीरांचे शैक्षणिक विचार कथन केले. अध्यक्ष मा. श्री जे.के. जाधव (बापू) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. Karmaveer Bhaurao Patil’s birth anniversary at Palshet
यावेळी दहावी व बारावी मध्ये विशेष गुण संपादन करणारे विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केलेले विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक विचारे यांनी केले तर बक्षीस वितरणाचे नियोजन श्री पंडित डी.जे. व श्री लांबोर आर.डी. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्कूल कमिटी सदस्य माननीय प्रशांत पालशेतकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. Karmaveer Bhaurao Patil’s birth anniversary at Palshet
प्रमुख उपस्थितांमध्ये रयत शिक्षण संस्थेचे माजी विभागीय अधिकारी श्री मालुसरे, प्राचार्य जी. जे. पाटील, श्री एम. ए. चव्हाण, अँटनी डिसूजा पालशेत गावच्या सरपंच सौ संपदा चव्हाण, उपसरपंच श्री महेश वेल्हाळ, स्कूल कमिटी सदस्य श्री पंकज बिर्ज, श्री नार्वेकर, सौ शैलजा गुरव, सौ नीलिमा आडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री ढेंबरे सरांनी उपस्थित त्यांचे आभार मानले. Karmaveer Bhaurao Patil’s birth anniversary at Palshet