गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेलदूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरकर तर प्रमुख पाहुणे आरडीसीसी बँक रत्नागिरीचे माजी उपव्यवस्थापक श्री दुर्वास वनकर हे उपस्थित होते. Birth anniversary of Gandhi and Shastri at Nawanagar

महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर विद्यार्थी, शिक्षक यांची भाषणे झाली. त्यावेळी बोलताना दुर्वास वनकर म्हणाले की, महात्मा गांधीजी यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून सदोदित वाटचाल करावी. महात्मा गांधीजी यांच्या अंगी महत्त्वकांक्षा, सत्यनिष्ठा व स्वदेशावर प्रेम असे अनेक गुण होते. विद्यार्थ्यांनी हे गुण आत्मसात केल्यास त्यांना जीवनात खूप काही चांगले यश मिळू शकते. साधी राहणे व उच्च विचारसरणी म्हणून प्रसिद्ध असणारे, छोटी मूर्ती पण कीर्ती मोठी असे लालबहादूर शास्त्री हे कणखर व्यक्तिमत्त्वाचे होते. या दोन्ही थोर नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर कोळथरकर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाबद्दल व शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत व शाळेच्या गुणवत्ता विकासाकडे गतीने वाटचाल होत आहे. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री हे देशाचे थोर आधारस्तंभ होते त्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. आपण त्यांचे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. Birth anniversary of Gandhi and Shastri at Nawanagar

यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, उलघना पाटील, परीक्षित दाभोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, उलघना पाटील, अंकिता कोळथरकर, परीक्षित दाभोळकर, सोनाली खडपे, सलोनी पालशेतकर, नैतिक हरचकर, सदस्य व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी केले. Birth anniversary of Gandhi and Shastri at Nawanagar

