गुहागर, ता. 04 : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. Gandhi and Shastri Jayanti at Talvali
कार्यक्रमाची सुरुवात म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना मुख्याध्यापक श्री.एम.ए. थरकार सर व जेष्ठ शिक्षक श्री.एन.पी.वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून केली. या आयोजित कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.श्रीनाथ कुळे सर यांनी केले. इ. नववीच्या विद्यार्थीनीं कु.माही मयेकर, कु.समिधा जोयशी, कु.समिधा चव्हाण या विद्यार्थ्यांनीनी सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार या जबाबदाऱ्या सुंदररीत्या पार पाडल्या. त्यांना श्री.कुळे सर यांनी मार्गदर्शन केले. Gandhi and Shastri Jayanti at Talvali

यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. पी. एन. साळुंखे सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर आधारित अनेक उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार सर यांनीही म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. आणि काही विद्यार्थ्यांची भाषणेही झाली. एकंदरीत हा कार्यक्रम अगदी उत्साही वातावरणात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.वैद्य सर, श्री. कचरे सर, श्री.साळुंखे सर, श्री.केळस्कर सर, सौ.नाईक मॅडम, श्री.बागल सर, श्री.कुळे सर, प्रा.सौ.आयरे मॅडम, श्री.पुनस्कर सर, अक्षय चव्हाण व इतर शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास प्रशालेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. Gandhi and Shastri Jayanti at Talvali
