• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हाधिकारी यांनी केली शासकीय रुग्णालयाची पाहणी

by Manoj Bavdhankar
October 4, 2023
in Ratnagiri
71 0
0
Collector inspected the government hospitalCollector inspected the government hospital
139
SHARES
397
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, दि. 04 : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. शिवाय रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांच्याशी संवाद साधला. यावेळी ‘डॉक्टर्स येऊन तपासता का… औषधं उपलब्ध आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना…’ असे प्रश्न विचारत होते. Collector inspected the government hospital

जिल्हाधिकारी श्री. सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शासकीय रुग्णालयाला भेट दिली.  त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी रुग्णालयातील एनआयसीयु, एनआरएचएम, प्रशासकीय विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन, पीसीपीएनडीटी विधी समुपदेशक दालन, स्त्री रुग्ण विभाग, पुरुष रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, भौतिक उपचार, डीईआयसी, फिजीओथेरेपी विभागांची पाहणी करुन माहिती घेतली. Collector inspected the government hospital

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत उपचाराबाबत विचारपूस केली. त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आणि सेवेवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांशीही, पुरेशी औषध उपलब्ध आहेत का.. अशी विचारणा करुन नसतील तर जी लागणार आहेत त्याबाबत खरेदीचा प्रस्ताव द्या, असे सांगून त्यांनी दाखल रुग्णांचीही माहिती घेतली. यावेळी उपस्थित परिचारिकांशी संवाद साधून, एकीलाचा ड्युटी लावली जाते का..वेळेपेक्षा जादा तर ड्युटी लावली जात नाही ना..अशी विचारपूस केली. काही अडचण असल्यास पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याबाबतही त्यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत विशेषत: स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेविषयी त्यांनी विचारणा केली. Collector inspected the government hospital

यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, सहा महिन्यापूर्वी मी भेट दिली होती. त्यावेळी पेक्षा आजच्या भेटीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये खूप सुधारणा झाल्याचे मला आढळून आले. रुग्णालयामध्ये सर्वत्र साफसफाई दिसून आली. उपचारदेखील चांगले केले जात आहेत. त्याबाबत रुग्ण, नातेवाईक यांनीही समाधान व्यक्त केले. स्टाफ आणि रिक्त जागांबाबत शासनस्तरावर मागणी करुन पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले. Collector inspected the government hospital

Tags: Collector inspected the government hospitalGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.