• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठमध्ये स्वच्छता हीच सेवा उपक्रम

by Guhagar News
October 3, 2023
in Guhagar
91 1
1
उमराठमध्ये स्वच्छता हीच सेवा उपक्रम
180
SHARES
513
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निर्मल ग्रामपंचायत उमराठने राबविला एक तास स्वच्छतेसाठी

जनार्दन आंबेकर, सरपंच
गुहागर, ता. 03 : शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा – २ अभियानांतर्गत शनिवार दि. ३०.०९.२०२३ रोजी निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि पुर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ यांच्या संयुक्त विद्यमाने एक तास स्वच्छतेसाठी – स्वच्छता हीच सेवा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. Cleanliness is a service activity in Umrath

यावेळी सुरुवातीला निर्मल ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक श्री सिद्धेश्वर लेंडवे भाऊ आणि उमराठ शाळा नं.१ चे शिक्षक श्री. अनिल अवेरे सर यांनी सदर उपक्रमाची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना आणि उपस्थित ग्रामस्थांना दिली. सदर स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा ते गोरिवले वाडी पर्यंत अमृत कलशासह पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली. Cleanliness is a service activity in Umrath

सदर पदयात्रेत वसुंधरेची काळजी घेऊया, आपल्या गावाला हरीत बनवूया. स्वच्छ, सुंदर व हरीत गाव, अव्वल महाराष्ट्र घडवूया. अशा प्रकारचा प्रबोधनात्मक फलक(बॅनर) अग्रस्थानी होता.  तशाच प्रकारे घोषणा देत व कचरा मुक्त भारत करूया, इत्यादी घोषणा देत विद्यार्थींनी सारा परिसर दणाणून सोडला होता.  सदर पदयात्रा माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदीप गोरिवले यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांच्या हस्ते मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत मुठभर माती अमृत कलशात जमा करून गोरिवलेवाडीतून पदयात्रा पुन्हा शाळेत आली. Cleanliness is a service activity in Umrath

त्या नंतर शाळा परिसरात तसेच उमराठ आरोग्य उपकेंद्र परिसरात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता अभियानात निर्मल ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उमराठ शाळा नं.१ चे मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर सर, अनिल अवेरे सर, स्वयंसेवक शिक्षिका प्राची पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, कुंदन कदम, विनायक कदम, नरेश पवार, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक अजय हळये, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, सानिका धनावडे, मदतनीस समृद्धी गोरिवले, आशा सेविका वर्षा गावणंग, शाळा पोषण आहार अन्नदात्या वैष्णवी पवार, सानिका पवार, मानसी गावणंग, बचतगटाच्या महिला आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मल ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि शाईस दवंडे यांनी उत्तम नियोजन आणि मोलाचे सहकार्य केले. Cleanliness is a service activity in Umrath

Tags: Cleanliness is a service activity in UmrathGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.