यश सिध्दी माजी सैनिक संघाच्या वतीने आयोजन
संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 29 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने स्थापन झालेल्या भारतीय भूदल सेनेतील परमवीर चक्र, अशोक चक्र, वीर चक्र आदी अनेक विविधांगी शौर्य पदकांनी सन्मानित झालेल्या शूर, पराक्रमी योद्धांच्या महार रेजिमेंटचा ८३ व्या स्थापना दिना(रेजिंग डे) चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी स. ९.०० वाजता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, प्रांत कार्यालय जवळ, चिपळूण येथे यश सिद्धी माजी सैनिक संघ (रजि.) महाराष्ट्र राज्य, प्रधान कार्यालय, चिपळूण येथे संघटनेच्या आजी माजी सैनिक, कुटुंब परिवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. Mahar Regiment Foundation Day at Chiplun

महार रेजिमेंट हि भारतीय सैन्य दलातील लढाऊ रेजिमेंट आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नाने स्थापन झालेली हि रेजिमेंट भारतातील सगळ्या समुदाय आणि क्षेत्रातील सैनिकांना सामावून घेऊन स्थापन करण्यात आलेल्या या रेजिमेंटला आज ८३ वर्ष पूर्ण झाली. पोर्तुगीज, डज, फ्रेंच, इंग्रज, मोघल साम्राज्यां समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य करिता प्राण पणाला लावलेल्या नागवंशीय ‘महार’ जातीच्या शौर्य, पराक्रम आणि त्याग, बलिदानाच्या इतिहासामुळे महार रेजिमेंट हे नाव भारतीय सैन्यदलातल्या या रेजिमेंटला प्राप्त झाले. अशा या महार रेजिमेंटचा ८३ व्या स्थापना दिना (रेजिंग डे) चे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्धापन दिन कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष (निवृत्त) सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तर स्वागताध्यक्ष (निवृत्त) सुभेदार प्रकाश कांबळे (उपाध्यक्ष) श्री.राजेश पवार (अध्यक्ष, मुंबई), श्री .चंद्रकांत कदम (कार्याध्यक्ष) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. Mahar Regiment Foundation Day at Chiplun

सदर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती चिपळूण, श्री.बी.डी.कांबळे, कॅप्टन संतोष कदम (माजी सैनिक मुलांचे वसतिगृह चिपळूण), अँड. अशोक निकम (हायकोर्ट चिपळूण), श्री गिरीराज पांडे सर व प्रा.के.एस.सावरे सर(डी.बी.जे कॉलेज चिपळूण), आणि मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांच्यासह बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक व प्रबोधनकार आयु. सुनील शिवगण सर प्रमुख वक्ते म्हणून प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच शासकीय पूर्ण नियुक्ती माजी सैनिक संघटना, शाखा रत्नागिरी, जिल्हा माजी सैनिक संघटना, चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती, भारतीय बौद्ध महासभा (चिपळूण), बौद्धजन पंचायत समिती, बौद्धजन पंचायत उत्कर्ष समिती आदी विविध संस्थेचे अध्यक्ष, सचिवांना निमंत्रित करण्यात आले आहे. Mahar Regiment Foundation Day at Chiplun
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आजी माजी सैनिक, पदाधिकारी आणि सैनिक कुटुंब, मित्र परिवारांनी बहूसंख्येने वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे संस्थाध्यक्ष (निवृत्त) सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते यांनी यश सिद्धी माजी सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य (मुख्य कमिटी, मुंबई कमिटी) यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे जाहिर आवाहन केले आहे. Mahar Regiment Foundation Day at Chiplun

