विद्यार्थ्याचं टॅलेंट शोधणारी ऑलिंपियाडमुव्हमेंटस्पर्धा-परीक्षा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 28 : SSC बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्यांसाठी ‘MKCL ऑलिंपियाडमुव्हमेंटस्पर्धा-परीक्षा २०२३ ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दि. १ नोव्हेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे. MKCL Competitive Exam for Students

विद्यार्थ्यांनी जवळच्या MKCLच्या केंद्रात कंप्यूटरवर परीक्षा देण्यासाठी प्रवेश शुल्क १००/- रुपये भरुन आजच प्रवेश निश्चित करावा, असे जाहीर आवाहन MKCL ने प्रसिद्धि पत्रकाव्दारे प्रसिद्ध केले असून अधिक माहिती साठी व प्रवेशासाठी सुयश कंप्यूटर सेंटर आबलोली अथवा नजीकच्या एमकेसीएल अधिकृत सेंटर मध्ये भेट द्या असेही आवाहन करण्यात आले आहे. MKCL Competitive Exam for Students
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, Soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. परीक्षेतील प्रश्न प्रकार आणि प्रश्नांचे स्वरूप हे जागतिक पातळीवरील मानकांनुसार तयार केले गेले आहेत. या स्पर्धा परीक्षेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर काही लाखांची परितोषिकेही दिली जाणार आहेत. MKCL Competitive Exam for Students

MKCL च्या केंद्रात कंप्यूटरवर परीक्षा
• विद्यार्थ्यांच्या विविधांगी शैक्षणिक गुणवत्तेला आणि बुद्धीला आव्हान देणारे प्रश्न
• एकच पेपर, सर्व विषय, प्रथम सत्राचा अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास – संवाद कौशल्य, मृदू कौशल्य, सामान्य ज्ञान, यावर आधारित.
• काठीण्य पातळी आणि शैक्षणिक उद्दिष्टानुसार प्रत्येक प्रश्नाला वेगळे गुण
• एक तासात जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं चॅलेंज. अमर्याद प्रश्न.
• बहुदिश विचार करण्यास प्रवृत्त करणारे, ज्ञानाचे उपयोजन, विषयांचा परस्पर संबंध लावून सोडवण्याचे, विचारांची आणि मनाची कवाडे उघडायला लावणारे, मुलांच्या भावविश्वातील प्रसंगांवर आधारित आव्हानात्मक प्रश्न
• नवनवीन प्रश्न प्रकार
• विद्यार्थ्याने सोडविलेल्या प्रश्नांनुसार तिचा कींवा त्याचा शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्ततेचा विषयवार अहवाल
अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सुयश कंम्प्युटर, आबलोली अथवा नजीकच्या एमकेसीएल अधिकृत सेंटर मध्ये भेट द्या.असे आवाहन प्रशिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे. MKCL Competitive Exam for Students