सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मनसेने केले स्वागत
गुहागर, ता.28 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो… मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे झिंदाबाद, अशा जोरदार घोषणा देत मंगळवारी रात्री दुकाने, आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. Marathi boards should be put up on shops

मनसे गुहागरच्या वतीने शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयासमोर गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यानी हातात मनसेचे झेंडे घेत, फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. पंरतु या निर्णयांची अंमलबजावणी त्वरीत व्हावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. मराठीत पाट्या लावण्यात आला नाहीत तर याद राखा असा इशाराही मनसे सैनिकांच्यावतीने देण्यात आला. दुकाने व आस्थापना यावर मराठी पाट्या लावाव्यात यासंदर्भात गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लढा दिला जात आहे. काही व्यापाऱ्यानी हा विषय सुप्रीम कोर्टात नेला होता. मात्र यावर आता सुप्रीम कोर्टाने निर्णय देत पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लागल्याच पाहीजेत असा स्पष्ट निकाल दिल्याने मनसे सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले व सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्यानुसार गुहागर तालुक्यात जोरदारपणे स्वागत करण्यात आले. Marathi boards should be put up on shops

यावेळी मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, विद्यार्थी सेनेचे सागर शिरगावकर, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, सचिव श्रीराम विचारे, उपतालुकाध्यक्ष सुनील मुकनाक व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. Marathi boards should be put up on shops
