पावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला
गुहागर, ता. 28 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पाणी भात शेतात कायम साचून राहिल्यामुळे सद्या पोटरी वळलेले या पिकावर मोठ्या पावसाने विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. Rice crop in danger due to incessant rains
शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने व मेहनतीने शेती केली असून रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे घराजवळ भात खाचरात मोठ्या प्रमाणावर भाताचे पिक घेतले आहे. त्यासाठी भाजावळी पूर्व मशागत व त्यानंतर नांगरणी साठी पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाताची शेती केली आहे. खते व मजुरी यावर शेतकऱ्यांचे भरपूर श्रम व पैसा खर्च झाला आहे. गुहागर तालुक्यात भाताचे ४१०० हेक्टर क्षेत्र असून या पिकाची उत्पादकता हेक्टरी ३२०० क्विंटल प्रती हेक्टर आहे. त्या खालोखाल नागलीचे तालुक्यात ३९५० हेक्टर क्षेत्र आहे. नागली व वरी या पिकांचे तालुक्यात प्रत्येक गावात मोठे क्षेत्र होते. परंतू, जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी रानातल्या शेतीला रामराम केला. व घराजवळील खाचरात व सखल भागात भात पिकावर जोर धरला. Rice crop in danger due to incessant rains

यामुळे सुरू असलेल्या पावसात भात नागली व नारळ सुपारी तसेच आंबा व काजू पिकावर बुरशी जन्य रोगावरील फवारणी करू नये. कारण पावसात ही फवारणी वाया जाऊ शकते. भात खाचरात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. खतांची मात्रा द्यावयाची असल्यास काही दिवस पाऊस थांबण्याची वाट पहावी असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. Rice crop in danger due to incessant rains

यावर्षी जुलैमध्ये चांगला पाऊस होता. तर ऑगस्ट महिन्यात उन्हाचा कडाका वाढला होता. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली. अखेरीस तर धो धो पाऊस सुरू झाला आहे. भात लागवडीनंतर तिसऱ्या महिन्यात भाताच्या काड्या पोटरी वळतात. व दाणे तयार होतात. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असायला हवे. सप्टेंबरमध्ये भात खाचरात भाताच्या बुंध्यांशी कमी प्रमाणात पाणी असावे लागते. मात्र, सद्या कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरात भात कांडया वरपर्यंत भिजताना दिसत आहेत. या अशा परिस्थिति त बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. किडींचा प्रादुर्भाव वाढतो व तो पिकाच्या दृष्टिने हानीकारक ठरतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस अशीच संततधार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहनत केलेल्या शेतकऱ्यांचे या पावसाने तोंडचे पाणीच पळवळे आहे. Rice crop in danger due to incessant rains
