गुहागर, ता. 28 : सलग दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर मागील एक वर्ष बऱ्यापैकी व्यवसाय झाला. मात्र, यावर्षी गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदीमुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. शृंगारतळीतील व्यापाऱ्यांचा सर्वाधिक व्यवसाय झाल्याचे समोर आले आहे. परिणामी या गणेशोत्सवात व्यापाऱ्यांना चांगले दिवस अनुभवायला मिळाले. Good day to traders on Ganeshotsav

गुहागर तालुक्याची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होत असलेल्या शृंगारतळी या मध्यवर्ती बाजारपेठेत या गणेशोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. जानवळे फाटा ते गुहागर कॉलेज पर्यंतच्या सुमारे दिड किलो मिटर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही बाजारपेठ असून सर्व प्रकारच्या वस्तू घाऊक व किरकोळ विक्रीची येथे दुकाने आहेत. सद्या किराणा मालाच्या दुकानातून मॉल टाईप खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. संपूर्ण दुकानात फिरून आपल्याला हवी ती वस्तू स्वतः जमा करून त्यानंतर पावती करणे ग्राहक पसंत करतात. Good day to traders on Ganeshotsav

जानवळे फाट्या समोरील कुणबी ग्राहक भांडार, बँक ऑफ इंडिया खाली अपना बाजार व मालाणी यांचा प्रशस्त दुमजली मालाणी मार्ट असे शृंगारतळीत आहेत. या मॉल मध्ये किराणा धान्य वस्तू पासून कपडे, पास्टिक आकर्षक वस्त, सौंदर्य प्रसाधने, गिफ्ट वस्तू असे मोठमोठ्या शहरात असणाऱ्या वस्तू आहेत. ७ ते ८ जणांनी फुलांच्या आकर्षक हारांची दुकाने थाटली असून मिठाईचीही सात- आठ दुकाने आहेत. चिकन आणि मटण दुकानेही अनेक आहेत. चार मोठी मद्याची दुकाने असून असंख्य हॉटेल आहेत. पादत्राणे, पॅस्टिक वस्तू व कापड दुकानेही मोठ्या प्रमाणावर आहेत. इमारत बांधकाम साहित्य विकणारी अनेक दुकाने तळीवर सापडतात. Good day to traders on Ganeshotsav

हायस्कुल, कॉलेज सह अनेक प्रकारचे कोर्स असणारी खाजगी महाविद्यालय शृंगारतळीत असल्याने संपूर्ण गुहागर तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी रोज येत – जात असतात. सर्व बँका याठिकाणी आहेत. त्यामुळे या बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते व येणारा प्रत्येक जण काही तरी खरेदी करतो. त्यामुळे ही बाजारपेठ सदानकदा भरलेली दिसते. सायंकाळच्या वेळी गुहागरातून मुंबईत जाण्यासाठी बहुतांशी ट्रॅव्हल्स तळीत थांबतात. त्यामुळे खेड्यापाड्यातील चाकरमानी पुढील प्रवासासाठी याठिकाणी येत असतो. तालुक्यात तळी सारखी अन्य कोणतीच बाजारपेठ नसल्याने ४५ किमी लांब असलेल्या चिपळूणला जाण्यापेक्षा शृंगारतळीत खरेदीसाठी जाणे पसंत करतो. Good day to traders on Ganeshotsav

कोरोना महामारीमुळे या व्यापारी पेठेवर विपरीत परिणाम झाला होता. सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्यामुळे व बाहेर कुठेही जाण्याची मोठी भिती असल्याने या गर्तेत ही बाजारपेठ अडकली होती. अनेक छोटी दुकाने बंद करावी लागली. ग्राहकच नसल्याने व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीवर मोठा विपरीत परिणाम झाला. गतवर्षी बऱ्यापैकी व्यवसाय झाला. मात्र, यावर्षी तर तालुक्यात विक्रमी गणेशभक्त दाखल झाल्याने इथल्या व्यावसायिकांना चागले दिवस आले. Good day to traders on Ganeshotsav
