गुहागर, ता. 27 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष ला. संतोष वरंडे व सचिव ला. सचिन मुसळे यांच्या माध्यमातून खजिनदार ला. मनिष खरे व ला. माधव ओक यांच्या विशेष सहकार्यातून गणेश उत्सवात गणेश भक्तांना गुहागरात घेऊन येणाऱ्या एसटी बस कर्मचाऱ्यांना भंडारी भवन हॉल येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. Food donation to ST employees by Lions Club


यावर्षी गुहागर तालुक्यात गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त दाखल झाले होते. यानिमित्ताने एसटी चालक व वाहक कर्मचारी सुद्धा गुहागर मध्ये मोठ्या संख्येने आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था शहरातील भंडारी भवन येथे करण्यात आली होती. गणेश उत्सव काळात शहरातील बहुतांशी हॉटेल व घरगुती खानावळी बंद असतात. अशावेळी आलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणासाठी वणवण भटकावे लागते. ही दखल घेत गुहागरच्या सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे २७५ कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच पाणी बॉटल देण्यात आली. याबद्दल या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. Food donation to ST employees by Lions Club


यावेळी एसटी महामंडळ गुहागरचे श्री. विवेक गानू, श्री. संदिप वैद्य, जिवनश्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. विनायक जाधव, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे माजी अध्यक्ष ला. शामकांत खातू, ला. निखिल तांबट उपस्थित होते. Food donation to ST employees by Lions Club


