रत्नागिरी, ता. 26 : कोंकण रेल्वे मार्गावारुन धावणा-या मडगाव नागपूर मडगांव या द्वी साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे. कोंकणातुन थेट शेगाव व विदर्भात जाण्याची सोय झाल्याने प्रवासी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. Extension of time till Margaon Nagpur Gadila

०११३९ नागपूर मडगाव हि गाडी दर बुधवार व शनिवारी नागपूरहुन मडगांव साठी रवाना होते तर ०११४० मडगांव नागपूर हि गाडी दर गुरुवार व रविवारी मडगांव हुन नागपूर करीता सुटते. श्री गजानन महाराजांचे दर्शनासाठी शेगावला थेट कोंकणातुन जाण्यासाठी हि गाडी म्हणजे एकमेव पर्याय आहे. तिला मुदतवाढ दिल्याने कोंकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य श्री सचिन वहाळकर यानी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. Extension of time till Margaon Nagpur Gadila

हि गाडी सध्या सुट्टी विशेष (हॉलिडे स्पेशल) म्हणुन धावत असल्याने तिचे तिकिट दर नियमित गाड्यांपेक्षा जास्त आहेत. या गाडीला मिळणारा प्रतिसाद पहाता नागपुर मडगांव नागपूर हि गाडी नियमित करावी अशी मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे. Extension of time till Margaon Nagpur Gadila
