• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पंचायत समिती तर्फे दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर

by Ganesh Dhanawade
September 26, 2023
in Guhagar
372 4
0
Disability Certificate Camp by Panchayat Samiti

दिव्यांगांची तपासणी करताना गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व बालरोगतज्ञ डॉ. एस. के. बळवंत

731
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागरच्यावतीने तालुकास्तरीय दिव्यांग कल्याण समितीचे अध्यक्ष आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समिती सेस ५ टक्के दिव्यांग कल्याणकारी योजनेतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे पार पडले. या शिबिरात ३५० हुन अधिक दिव्यांगानी सहभाग घेतला होता. Disability Certificate Camp by Panchayat Samiti

Disability Certificate Camp by Panchayat Samiti
दिव्यांगांची तपासणी करताना गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व बालरोगतज्ञ डॉ. एस. के. बळवंत

या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे व गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, मज्जातिव्र आजार, कंपावत रोग अंध, अंशत: अंध दृष्टीदोष मतिमंद मानसिक आजार, अविकसित स्वमग्न, बालरोग, सेलेब्रल पाल्सी अध्ययन क्षमता आदींची तपासणी करण्यात आली. Disability Certificate Camp by Panchayat Samiti

यावेळी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे मनोविकार तज्ञ डॉ. अमित लवेकर, नेत्ररोगतज्ञ डॉ. वनिता कानगुळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. अमरीश आगाशे, बुध्यांक तपासणी तज्ञ डॉ. प्रमोद शाक्य, भौतिक उपचार तज्ञ डॉ. अमित वायंगणकर, व्यवसायउपचार तज्ञ डॉ. कुणाल देसाई, गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व बालरोगतज्ञ डॉ. एस. के. बळवंत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, नेत्ररोग तज्ञ डॉ. दिनेश जोशी, गुहागर तालुका अपग पुनवसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, कृषी विस्तार अधिकारी राजकुमार धायगुडे आदींसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतचे सर्व डाटा ऑपरेटर उपस्थित होते. Disability Certificate Camp by Panchayat Samiti

दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिरासाठी पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, शिक्षण विभाग कर्मचारी, सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, गुहागर ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. Disability Certificate Camp by Panchayat Samiti

Tags: Disability Certificate Camp by Panchayat SamitiGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share292SendTweet183
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.