संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील सुर्या ग्रुप संघटना, खोडदे मोहिते – तांबे वाडी, या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे हे १० वे वर्षे होते. ह्या दशकपूर्ती कार्यक्रमाला वाडीतील ३०० मंडळी उपस्थित होते. Student Appreciation Ceremony by Surya Group

१० वर्ष परिवर्तनाची! संघर्षाची! अभिमानाची वाडीतील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थाना, पालकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने शिक्षण घ्या ! संघटित व्हा! संघर्ष करा! यशस्वी व्हा ! या घोषवाक्याच्या खाली १० वर्षा पूर्वी ह्या गुणगौरव सोहळ्याची सुरवात छोट्याशा बक्षीसाने करण्यात आली होती. आज १० वर्षाच्या प्रवासानंतर ह्या सोहळ्याने भव्य दिव्य अस रूप घेतले आहे. सुर्या ग्रुप संघटनेच्या ह्या १० वर्षाच्या प्रवासात संघटनेच्या सर्व सदस्यांनी संघटनेसाठी खूप मेहनत केली आहे तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी आर्थिक हातभार लावून मौलाचे सहकार्य केले आहे. Student Appreciation Ceremony by Surya Group

संघटनेच्या ह्या प्रवासात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून संघटनेला दिशा देण्यात आपले योगदान दिले आहे. ह्या दशकपूर्ती कार्यक्रमानिमित्ताने स्त्री-शक्तीचा सन्मान म्हणून ह्या वर्षीचे बक्षीस वितरण वाडीतील महिलाच्या हस्ते करण्यात आले, तसेच वाडीतील महिलांसाठी आणि मुलांसाठी विविध स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वानी मोठ्या प्रमाणत सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. Student Appreciation Ceremony by Surya Group

दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सुर्या ग्रुप संघटनेकडून वाडीतील प्रत्येक परिवाराला सन्मानचिन्ह देऊन त्यांनी दिलेल्या योगदान आणि सहकार्य बद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे संघटनेसाठी गेले १० वर्ष मेहनत करणाऱ्या वरिष्ठ सहकार्यांना त्यांनी दिलेल्या विशेष सेवे बद्दल, योगदानाबद्दल मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. Student Appreciation Ceremony by Surya Group

सुर्या ग्रुप संघटनेसाठी सुवर्णक्षण असणाऱ्या ह्या गुणगौरव सोहळ्यात वाडीतील सर्व वरिष्ठ मान्यवर, संपूर्ण महिला मंडळ तसेच संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित राहून ह्या सुवर्णदिनाचे साक्षीदार बनले. १० व्या दशकपूर्ती सोहळ्याला सर्व मुलांच्या मेहनती मुले तसेच श्री वैभव गणपत तांबे यांनी आपल्या विशेष आणि रचनात्मक शैलीत सूत्रसंचालन करून आणखीनच भव्य-दिव्य असे स्वरूप प्राप्त झाले. Student Appreciation Ceremony by Surya Group
