• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

by Ganesh Dhanawade
February 28, 2021
in Old News
16 0
0
उमराठ ग्रामपंचायतीतर्फे सरपंच आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जनार्दन आंबेकर ; गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांशी सुसंवाद साधणार

गुहागर : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर, उपसरपंच सुरज अरुण घाडे व सदस्य यांनी उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या, विकासकामे, शासकीय योजना, महिला बचत गटात सक्रीय सहभाग, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा परिचय होणे, विकासकामे , गावातील समस्या व सोयी-सुविधांचा अभाव आदीबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे, ग्रामस्थांशी चर्चा करणे व मार्गदर्शन करणे, आपला गाव आदर्श गाव ही संकल्पना पूर्ण करणे आदी कामांबाबतच्या हेतूने “सरपंच आपल्या दारी” हा उपक्रम २ मार्च पासून उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसात राबविण्यात येणार आहे.
उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायतीतर्फे उमराठ गावात “सरपंच आपल्या दारी “या उपक्रमांतर्गत उमराठबुद्रुक व उमराठखुर्द या दोन महसूल गावातील तीन प्रभागातील दहा वाड्यांमध्ये वाडी भेट सदिच्छा कार्यक्रम नियोजित केला आहे. २ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत दहा दिवस ( काही दिवस वगळून ) उमराठ गावातील प्रत्येक वाडीत सदिच्छा भेटीतून “सरपंच आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जाणार आहे.  २ मार्च रोजी मराठवाडी, ३ रोजी घाडेवाडी,  ४ रोजी गोरिवलेवाडी,  ५ रोजी धारवाडी, ६ रोजी धनावडेवाडी,  ७ राजी बौद्धवाडी, ८ रोजी जालगावकरवाडी, १० रोजी आंबेकरवाडी व १५ मार्च रोजी डागवाडी व कोंडवीवाडी असा सदिच्छा वाडीभेटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी ग्रामस्थांच्या गैरसोयी व अडचणी जाणून घेणे,  गावाच्या विकास कामांबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे , शासकीय योजनांची ग्रामस्थांना माहिती देणे, शासकीय योजना राबविण्याबाबत मार्गदर्शन करणे, शैक्षणिक, आरोग्य व स्वच्छताविषयी मार्गदर्शन करणे, शेती, पशुपालन फलोत्पादन याविषयी माहिती देऊन स्वावलंबी होण्याबाबत मार्गदर्शन करणे, बेरोजगारांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करणे, क्रीडा व हस्तकौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करणे, महिला बचत गटाचे महत्व पटवून देऊन महिलांना बचत गटात सक्रिय सहभागाबाबत प्रोत्साहन देणे व सक्षम बनविणे, ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांतून लघुउद्योग निर्माण करणेबाबत मार्गदर्शन करणे व सूचना स्वीकारणे, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाड्यांमध्ये मूलभूत गरजा व सोयीसुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करुन “आपला गाव आदर्श गाव” ही संकल्पना पूर्ण करणे,  “आमचा गाव आमचा विकास ” या शासनाच्या घोषवाक्यानुसार  ग्रामपंचायत क्षेत्रातील वाड्या सक्षम व समृद्ध होणेबाबत मार्गदर्शन करणे व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे असे हेतु व उद्दिष्ट “सरपंच आपल्या दारी “या उपक्रमाचे आहेत अशी माहिती सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांनी  दिली.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.