शेटये कुटुंबाच्या २५ घरांचा एकत्रित गणेशोत्सव
गुहागर, ता. 25 : काळाच्या ओघात कुटुंबे विस्तारत गेली तशीच ती विभक्तीही होत गेली. विभक्त कुटुंबाची वेगवेगळी घरे झाली आणि प्रत्येक सणवार त्या सगळ्या घरांमध्ये साजरा होत गेला. ह्या सगळ्याला छेद देणारे कुटुंब म्हणजे सगमेश्वर येथील शेट्ये कुटुंब. २५ घरांचा एकत्रित गणेशोत्सव ह्या कुटुंबात साजरा होत असतो. The old tradition of Ganeshotsav was preserved
शेटये कुटुंबाचे संगमेश्वर येथील रामपेठेत मूळ घऱ आहे. ह्या कुटुंबियांचे पूर्वज बाळकृष्ण आणि मुरारी शेटये हे व्यवसायानिमित्य प्रथम संगमेश्वर सोडून बाहेर पडले. कालांतराने हे कुटुंब विस्तारत गेले. कुटुंब जसे विस्तारत गेले तसे त्याची शहरातून आणि ठिकठिकाणी अनेक घरे झाली. पण असे असले तरी ह्या कोणत्याही घरात अथवा पिढीत स्वतंत्र गणपती स्थापन करण्याची परंपरा नाही. The old tradition of Ganeshotsav was preserved
गणेशोत्सवाच्या सणाच्या निमित्ताने शेट्ये कुटुंबिय आपल्या रामपेठेतल्या मूळ घरी एकत्र जमतात आणि तिथेच घराण्याचा गणेशोत्सव आणि गौरीउत्सव साजरा केला जातो. ह्या घराण्याचा गौरीउत्सवही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गणपती प्रमाणेच गौरीचेही आरास करून तिची स्थापना केली जाते. काळाच्या ओघात उत्सवांचे स्वरूप बदलत गेले. आज अनेक ठिकाणी डीजे आणि बॅन्जोचे आयोजन केले जाते. पण शेट्ये कुटुंबात मात आजही झिम्मा, फुगडी अशा पारंपारिक खेळांचेच आयोजन करून रात्र जागविली जाते. गौरीची आरती मध्यरात्री १२ वाजता केली जाते. सपूर्ण उत्सवाची आरास आणि देखावे हे कुटुंबिय स्वत: तयार करतात. The old tradition of Ganeshotsav was preserved
गौरीची एक आख्यायिका ह्या कुटुंबात सांगितली जाते. विसर्जनाच्या दिवशी गौरीच्या मुखवट्याचे डोळे पाणावतात आणि त्याच वेळी गौरीचे हात कुंकवाच्या करंड्यात उतरतात, अशी ती आख्यायिका आहे. गौरी विसर्जनाच्या आदल्या रात्री गौरीसमोर ठेवलेल्या पेल्यातील तांदळात आपोआप मूठभर वाढ होते असे शेट्ये कुटुंबिय सांगतात. The old tradition of Ganeshotsav was preserved