• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सातासमुद्रापार बाप्पाची आराधना

by Ganesh Dhanawade
September 25, 2023
in Bharat
79 1
4
Adoration of Bappa across Satasamudra
155
SHARES
444
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

युरोपमध्ये मराठमोळ्या युवकांनी साजरा केला गणेशोत्सव

गुहागर, ता. 25 : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. महाराष्ट्रतील मराठमोळ्या युवकांनीहि युरोप मधील स्लोवाकी नित्रा येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. ही सर्व तरुण मंडळी एप्रिल महिन्यात नोकरीच्या निमित्ताने परदेशात आले आहेत. Adoration of Bappa across Satasamudra

Adoration of Bappa across Satasamudra

महाराष्ट्रातून निखील रेवाळे (गुहागर, रत्नागिरी), जयेश शेलार (पुणे चाकण), केतन सोनार (जळगाव), चेतन जाधव (पुणे), प्रशांत भाटे (कोल्हापूर), सचिन मोरे (पुणे), ऋषिकेश चव्हाण (सातारा), निखील बोराडे (पुणे), विद्या कोरडे, तन्माई सुतार (भोसरी), अक्षय शेजवळ, महेश चाकवे (जुन्नर), अपूर्व कदम (गुहागर), अलिषा भालेराव (लोणावळा), पल्लवी राठोर नाशिक), कपिल मोरे (मुंबई), ललित दुसाने (नाशिक), नितेश तुपे (रायगड) आदी तरुण मंडळी वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलाखती देऊन युरोपमध्ये पहिल्यांदाच नोकरीसाठी बाहेर आले आहेत.  Adoration of Bappa across Satasamudra

Adoration of Bappa across Satasamudra

हे सर्वजण जग्वार लँड रोव्हर या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरीला आहेत. या तरुणांमधील जळगाव येथील केतन सोनार याने येतानाच आपल्या गावातून श्रींची मूर्ती आणली होती. हीच गणरायाची मूर्ती श्री गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात स्थानापन्न करण्यात आली. पाच दिवसांच्या गणेशाला सर्वांनी आपल्या हाताने मोदक बनवुन नेव्यद्य बनविला. आपल्या घरातील गणेशोत्सवाप्रमाणे सर्वांनी आरती आणि इतर कार्यक्रम केले. प्रत्येकाच्या कामाच्या वेळेनुसार बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात आली. आणि तेव्हढ्याच जल्लोषात बाप्पाची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. Adoration of Bappa across Satasamudra

Adoration of Bappa across Satasamudra

महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आम्ही जरी परदेशात असलो, तरी सांस्कृतिक परंपरेचे जतन आम्हाला करता येत आहे. गणेशोत्सवात घरची आठवत येत असली तरी हा उत्सव सातासमुद्रापार साजरा करताना खूप आनंद होत आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा केला जात असून, ‘श्री’चे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. – निखिल सुनील रेवाळे, गुहागर Adoration of Bappa across Satasamudra

Tags: Adoration of Bappa across SatasamudraGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share62SendTweet39
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.