• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत ढगाळ वातावरणातही विमान उतरणार

by Guhagar News
September 16, 2023
in Ratnagiri
67 1
1
The plane will land even in cloudy weather
132
SHARES
378
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अत्याधुनिक यंत्रणा असलेले महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरणार

रत्नागिरी, ता. 16 : रत्नागिरीत पावसाचे प्रमाण अधिक आहे. आकाशात ढग अधिक असतील तर विमान उतरण्यात अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी विमानतळावर अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. ती यंत्रे रत्नागिरीत दाखल झाली आहेत. त्यासाठी १७ एकर अधिक जागेची गरज असून, ती आठ दहा दिवसांत हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.  The plane will land even in cloudy weather

यावेळी पालक मंत्री उदय सामंत म्हणाले की, विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे काम डिसेंबर महिन्यात सुरू होईल. कोस्टगार्डच्या टॅक्सी ट्रॅकचे काम महिन्याभरात सुरू होईल. येथील कंपाउंड वॉलचे काम महिनाभरात संपेल. सद्य:स्थितीत रत्नागिरी विमानतळावर अत्यावश्यक वेळी रात्री विमान उतरवता येऊ शकते. पण, ही नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसवल्यानंतर नाइट लँडिंगही अधिक सोपे होईल. The plane will land even in cloudy weather

तसेच महावितरणसाठी जिल्ह्याला ९४८ कोटी १४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील आपत्कालीन कामांसाठी २९९ कोटी, किनारपट्टीवरील गावांमधील भुयारी वाहिन्यांसाठी ४५० कोटी, वीज वितरण हानी कमी करण्यासाठी जुन्या तारा बदलणे, डीपी बदलणे यासाठी ९८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्व मीटर बदलण्याचे काम केले जाणार आहे. नवीन उपकेंद्रे तसेच रोहित्र तसेच वाहिन्या यासाठी ४१४ कोटी रुपये मंजूर झाल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. The plane will land even in cloudy weather

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe plane will land even in cloudy weatherटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.