• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्कुल बस बंद बाबत तत्काळ चौकशी करा

by Mayuresh Patnakar
September 15, 2023
in Guhagar
199 2
6
Letter to District Collector regarding school bus
391
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

गुहागर, ता. 15 : अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील मुलांच्या आंदोलनाची दखल थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाने घेतली आहे. 13 सप्टेंबरला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना यासंदर्भात तत्काळ चौकशी करुन 7 दिवसांत अहवाल पाठविण्याची विनंती आयोगाचे मुख्य सचिव धर्मेंद्र भंडारी यांनी केली आहे. Letter to District Collector regarding school bus

Letter to District Collector regarding school bus

अंजनवेल येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची स्कुलबस सेवा नवीन शैक्षणिक वर्षात सुरु झाली नाही. त्यामुळे या शाळेतील पटसंख्या कमी झाली आहे. ही परिस्थिती अशीच सुरु राहीली तर या शाळेची पटसंख्या आणखी कमी होईल. शाळेची आंतरराष्ट्रीय स्कुलची मान्यता रद्द होईल. अशी चिंता आता येथील पालकांना भेडसावु लागली आहे. त्यामुळे 11 सप्टेंबर पासुन येथील विद्यार्थी आणि पालकांनी ग्रामपंचायत अंजनवेल येथे ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत अंजनवेलमधील सत्ताधाऱ्यांची अडचण झाली. तातडीने सरपंचानी शाळा व्यवस्थापन समितीच्या मागण्यांबाबत 15 सप्टेंबरच्या मासिक सभेत विचार केला जाईल असे पत्र देवून हे ठिय्या आंदोलन थांबविले. Letter to District Collector regarding school bus

दरम्यान शाळेतील एका विद्यार्थीनीने थेट राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे तक्रार केली होती. याबाबत आयोगाने स्वतंत्र चौकशी केली. या चौकशीमध्ये इयत्ता 6 वीमधील मुलींने केलेल्या तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे सदर संस्थेने  गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हाशिक्षणाधिकारी यांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले नसल्याचा आक्षेप घेतला आहे. तसेच यांच्यावर कारवाई करण्याचेही सुचविले आहे. Letter to District Collector regarding school bus

याबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे मुख्य सचिव धर्मेंद्र भंडारी यांनी थेट जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये भंडारी यांनी म्हटले आहे की सदर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत 15 कि.मी. अंतरावरुन विद्यार्थी येतात. ग्रामपंचायतीद्वारे या विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी तीन स्कुल बस सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र ही सेवा ग्रामपंचायतीने बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी संकटांचा सामना करावा लागतो. याबाबत आपण तत्काळ चौकशी करावी. सदर चौकशीचा अहवाल ७ दिवसांच्या आत आम्हांला पाठवावा. अंजनवेल मधील विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या व्यथेची दखल घेतल्याबाबत राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे आभार मानले आहेत. Letter to District Collector regarding school bus

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLetter to District Collector regarding school busMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share156SendTweet98
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.