मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच आयोजित
संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 29 : रत्नागिरी जिल्हयात गेली २८ वर्ष कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या संस्थेच्यावतीने ‘युध्दाकडून बुध्दाकडे’ या शीर्षकांर्गत राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा नि:शुल्क व सर्वांकरिता खुली आहे. ‘From War to Buddha’ Poetry Writing Contest
या कविता कु. संघराज संजय कदम, रुम नं-303, अजय रेसिडेन्सी, साकेत अपार्टमेंट, भूमि अभिलेख कार्यालय जवळ, पाग झरी रोड,चिपळूण,जि.रत्नागिरी (मोबाईल – ९५११२७३३५५) या क्रमांकावर PDF स्वरुपात किंवा SangharajK77@gmail.com वर दिनांक १५ ऑक्टोबर पूर्वी पाठवावे. सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रत्येक समाजघटकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी प्रशिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. ‘From War to Buddha’ Poetry Writing Contest

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) हि एक कौटुंबिक संस्था असून गेली २८ वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण आणि एडस या क्षेत्रात कार्यरत आहे. येत्या दसरा दिनाच्या निमित्ताने अर्थात अशोका विजया दशमी म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून एका आगळया वेगळया अभिनव कविता लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘From War to Buddha’ Poetry Writing Contest
आज विश्वातल्या विनाशाला कारणीभूत असलेल्या विविध भीषण समस्येमुळे पृथ्वीचा अंत जवळ येऊन ठेपला आहे. तिस-या महायुध्दाचे तीव्र पडसाद, दहशतवाद, जातीय दंगली, रक्तरंजित आंदोलने, पर्यावरणाची हानी, जीवघेणी प्रदुषणे, वाढती लोकसंख्या, महामारी, मंदी, बेकारी, महागाई आदी अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. याकरिता सामूहिक विश्वशांतीसाठी मंगल मैत्री भावनेने सगळयांनी एकसंघ झाले पाहिजे. याच अनुषंगाने विश्वविजेता सम्राट अशोका याचे स्मरण करुन ‘युध्दाकडून बुध्दाकडे’ या शीर्षकांर्गत आयोजित राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचे मुख्य प्रयोजन आहे. ‘From War to Buddha’ Poetry Writing Contest
विश्वाला युध्द हवे की बुध्द? किंवा सम्राट अशोक हे दोन कवितेचे विषय असून स्पर्धकांनी कोणत्याही काव्य प्रकारातील २० ते ३० ओळींची एक किंवा दोन कविता सुवाच्च अक्षरात किंवा टंकलेखन (टाईप) करुन पाठविणे. एका स्वतंत्र कागदावर नाव, गाव, संपर्क पत्ता, शिक्षण, व्यवसाय, छंद, मोबाईल, व्हाटस – अप क्रमांक लिहावा. ‘From War to Buddha’ Poetry Writing Contest

स्पर्धेतील पाच सर्वोत्तम विजेत्या स्पर्धकांना सम्राट अशोका ‘युध्दाकडून बुध्दाकडे’ काव्य सन्मान २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तर सहभागी स्पर्धकांना आकर्षक सन्मानपत्र, सन्मान प्रतिक देण्यात येईल. चिपळूण तालुक्यातील कवी, लेखक, वक्ता, जलसाकार आणि जिल्हा, तालुकास्तरीय शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक संघटनांचे जेष्ठ पदाधिकारी स्मृतीशेष अशोक दाजी कदम (कुटरेकर) यांच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ हे पुरस्कार नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान संस्थेच्या खास कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. ‘From War to Buddha’ Poetry Writing Contest
