आरोग्य मंत्री तानाजी सावंत, संघटनेच्या प्रयत्नांना यश
Guhagar News, ता. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनात 5 टक्के वाढ (Salary of CHO increased) होणार आहे. याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. गेले वर्षभर अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.Salary of CHO increased

मार्च 2019 मध्ये आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमात वैद्यकिय शिक्षण पूर्ण झालेल्यांना विशेष प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात नियुक्त करण्यात आले. आज महाराष्ट्रात 8 हजार 500 हून अधिक समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. सदरचे पद कंत्राटी पध्दतीचे असल्याने पहिल्या वर्षी रु. 25 हजार मासिक वेतन Salary आणि दरवर्षी मुळ वेतन रक्कमेत 5 टक्के वाढ केली जाईल असा करार करण्यात आला होता. मात्र 2019 नंतर कोणत्याच समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला गेल्या 4 वर्षात वेतन वाढ मिळाली नाही. Salary of CHO increased

Salary of CHO increased
याबाबत अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. दत्ता मुळे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. वेतनवाढीसह समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची विनंती केली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या संघटनेच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यातुन 2005 पासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विषय मार्गी लागला. त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना म्युच्युअल ट्रान्सफरचा नियम लागू झाला. तसेच वार्षिक वेतनवाढीचा निर्णयही राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकाऱ्यांनी घेतला. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये सन 2019 व त्यानंतर भरतील झालेल्या व सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांना वार्षिक वेतनवाढ व मागील वेतनवाढीतील देय फरकाची रक्कम देण्याचे कळवीले आहे. Salary of CHO increased
या निर्णयाबाबत अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. दत्ता मुळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत. ४ वर्ष वेतनवाढीचा निर्णय रखडल्यामुळे शहरापासून दूर ग्रामीण भागात कंत्राटी पध्दतीने आरोग्य सेवा करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. पहिल्या बॅचमधील काहींनी हे काम सोडून स्वत:चा वैद्यकिय व्यवसाय सुरु केला. मात्र आता वेतनवाढ व बदलीबाबतचा निर्णय झाल्याने हे कंत्राटी डॉक्टर नव्या उर्जेने काम करतील. अशी प्रतिक्रिया डॉ. मुळे यांनी व्यक्त केली आहे. Salary of CHO increased

