महसुल सप्ताह; गिमवीतील कातकरी ग्रामस्थांबरोबर जनसंवाद
गुहागर, 05 : गिमवीमधील कातकरी वस्तीपर्यंत गाडी रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून सुमारे 3 कि.मी. पायवाटेने जाताना चिखल तुडवत, एक नाला पार करत पोचावे लागते. या वस्तीत 7 घरांमध्ये 9 कुटुंबात 30 जण रहातात. इतक्या छोट्या आणि दुर्गम भागातील वस्तीत जिल्हाधिकाऱ्यांसह महसुल प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी पदयात्रा करत पोचले. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. Collector’s 3 km walk for 9 families

राज्यात सध्या महसूल सप्ताह सुरु आहे. 7 ऑगस्टपर्यत प्रत्येक दिवसाला एक उपक्रम याप्रमाणे युवासंवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्याच्यासाठी, महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी याच्याबरोबर संवाद असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता 4) जनसंवाद उपक्रमांतर्गत गिमवी कातकरी वाडीमधील ग्रामस्थांबरोबर जनसंवादाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह (Ratnagiri Collector M. Devender Shinh)उपस्थित होते. Collector’s 3 km walk for 9 families

गीमवी कातकरीवाडीतील तीन विद्यार्थ्यांनी दहावीनंतरचे शिक्षण घेतले आहे. यामध्ये एका विद्यार्थ्यांने आयटीआयचा कोर्स पूर्ण केला आहे. एक विद्यार्थीनी द्वितीय वर्ष कला विद्याशाखेत शिकत आहे. तर एक विद्यार्थीनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांना सातबारा, 8 अ, फेरफार, उत्पन्नाचे दाखले, दोन ग्रामस्थांना नवीन रेशन कार्ड, प्राधान्य कुटुंब लाभ मंजुरीचे पत्र आदी शासकीय दस्तऐवजांचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी निराधार योजनेची माहिती सांगितली. गुहागरच्या आरोग्य विभागामार्फत कातकरी वस्तीतील सर्वांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. प्रथमच जिल्हाधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी कातकरीवाडीला भेट दिल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील काही ग्रामस्थांची व्यक्तिगत भेट घेवून आवर्जुन चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. Collector’s 3 km walk for 9 families

यावेळी गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे(Guhagar Tahsildar Mrs. Pratibha Varale), वैद्यकिय अधिकारी जांगीड, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, देवघरच्या सरपंच वैभवी जाधव, उपसरपंच महेंद्र गावडे, प्रसाद सोमण, विजय जाधव, नितीन जाधव, डॉ. संदीप जाधव आदी उपस्थित होते. Collector’s 3 km walk for 9 families

