पालपेणेतील जीवन ज्योती शाळेला साहित्याची भेट
गुहागर, ता. 05 : महसुल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी पालपेणे येथील जीवन ज्योती विशेष शाळेला भेट दिली. तेथील दिव्यांग विद्यार्थ्यांशी (disabled children) संवाद साधला. तसेच गुहागर महसुल प्रशासनाने सहभाग मुल्य एकत्रीत करुन या मुलांच्या शारिरीक वाढीकरीता आवश्यक साहित्याची भेट दिली. Collector’s interaction with disabled children

गीमवी कातकरी वस्तीमध्ये जनसंवादाचा कार्यक्रम झाल्यावर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (Ratnagiri Collector M. Devender Shinh) व तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे (Guhagar Tahsildar Mrs. Pratibha Varale) यांच्यासह महसुलचे अधिकारी व कर्मचारी पालपेणे येथील जीवन ज्योती विशेष शाळेत गेले. तेथील प्रत्येक वर्गात जावून देवेंदरसिंह आणि सौ. वराळे यांनी मुलांशी संवाद साधला. या दिव्यांग मुलांना बालसुलभ प्रश्र्न विचारुन, गमतीजमती सांगितल्या. मुलांच्या पालकांशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शाळेचे संचालक अजिंक्य पेडणेकर, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीबरोबरही गप्पा मारल्या. Collector’s interaction with disabled children

शाळेत दिव्यांगांच्या प्रगतीसाठी चालणारे विविध उपक्रम, स्वयंरोजगारासाठी सुरु असलेला प्रयत्न पाहुन जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी सर्वांचे कौतुक केले. गुहागरच्या महसुल प्रशासनाने या शाळेला मदत करण्याच्या उद्देशाने व्यक्तिगत पातळीवर सहभाग मुल्य एकत्रीत केले. या रक्कमेमधुन सुमारे 12 हजार रुपयांचे साहित्य विकत घेतले. यामध्ये दिव्यांग मुलांच्या शारिरीक वाढीसाठी फिजिओथिअरपीची कीट तसेच दोन वॉकर यांचा समावेश आहे. हे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शाळेला सुपूर्त करण्यात आले. Collector’s interaction with disabled children

