Guhagar News Special : Find Unknown SIM Card
अनेक वेळा आपले आधारकार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रांचा गैरवापर गुन्हेगार मोबाइल सीमकार्ड (Mobile Sim Card) घेण्यासाठी करतात. ही गोष्ट आता लपून राहीलेली नाही. या प्रकारांना आळा बसविण्यासाठी, सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नवी सुविधा भारतीयांसाठी उपलब्ध केली आहे. या सुविधेंतर्गत आपल्या आधारकार्डाला लिंक असलेले मोबाइल क्रमांक आपल्याला कळणार आहेत. त्यामुळे ही बातमी वाचा, बातमी दिलेल्या लिंक व सुचनांप्रमाणे कार्य करुन आपल्या नावावर किती सीमकार्ड आहेत याची माहिती घ्या. Find Unknown SIM Card


भारत सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार, एका व्यक्तीला आपल्या नावावर जास्तीतजास्त 9 सीमकार्ड घेतात येतात. ज्यावेळी 9 पेक्षा जास्त सीमकार्डसाठी आपण प्रयत्न करता. त्यावेळी तुम्हाला एसएमएसद्वारे केंद्र सरकारच्या टेलीकॉम विभागामार्फत सूचित केले जाते. मात्र अनेकवेळा आपण या संदेशाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे प्रत्यक्षात आपल्या नावावर किती सीमकार्ड (Sim Card) आहेत हे आपल्याला कळत नाही. अशा आपल्या नावावर असलेल्या परंतू आपल्याकडे नसलेल्या सीमकार्डचा वापर गुन्हेगार करत असतात. Find Unknown SIM Card


आता केंद्र सरकार एका व्यक्तिच्या नावे किती मोबाईल क्रमांक (सीम कार्ड) असावीत याची मर्यादा 4 पर्यंत कमी करण्याच्या विचारात आहे.
कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रम, ऑनलाइन मिटींग, वर्क फॉर्म होम असे बदल झाले. त्यावेळी आवश्यकता भासली म्हणून नवे मोबाईल क्रमांक (Mobile Numbers) एकाच व्यक्तीच्या नावावर घेतले गेले आहेत. अनेकांनी पूर्वी कधीतरी सिम कार्ड घेतली होती पण आत्ता ती वापरात नाहीत. त्याचाही गैरवापर होत असेल.
Find Unknown SIM Card
हा गैरवापर रोखण्यासाठी अतिरेकी कारवाया, सायबर गुन्हे तसेच अन्य गुन्ह्यांमध्ये वापरण्यात येणारी फेक सीम कार्ड शोधुन काढण्यासाठी केंद्र सरकारने आपल्याला आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करण्याचे आवाहन केले होते. आता त्याची पुढची पायरी म्हणून आपल्या आधारकार्डाला लिंक असलेल्या सर्व मोबाईल क्रमांकांची खात्री करण्याची सुविधा टेलिकॉम विभागाने (Telecom Analytics for Fraud Management & Customer Protection) उपलब्ध केली आहे. Find Unknown SIM Card
गुहागर न्यूजद्वारे ही माहिती सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम आम्ही करत आहोत. तरी आपल्या आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमाकांची (सीमकार्डची) माहिती कशी पहायची ते अगदी तपशीलवार आम्ही देत आहोत. आपण आमच्या माहितीचा वापर करुन आपल्या सीम कार्डची माहिती करुन घ्यावी. तसेच आमच्या बातमीची लिंक कुटुंबातील अन्य सदस्य, मित्र परिवाराला द्यावी. ही विनंती. Find Unknown SIM Card
Find Unknown SIM Card
यासाठी आपण खालील लिंक आणि सूचनांचा अवश्य वापर करा.
1. खालील लिंकवर क्लिक करा.
https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/loginPage
2. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक बॉक्स येईल (खालीलप्रमाणे)


या बॉक्समध्ये आधारकार्डला लिंक असलेला आपला मोबाईल क्रमांक लिहा. कॅप्टचा लिहा, ओटीपी टाका. Login वर क्लिक करा.
3. आता खालीलप्रमाणे आपल्या आधारकार्डला लिंक असलेल्या सर्व मोबाईलची यादी आपल्यासमोर येईल.


4. जे मोबाइल आपण वापरत आहात त्या मोबाईल क्रमांकाच्या मागे असलेल्या छोट्या बॉक्समध्ये क्लिक करुन नंतर Required या शब्दावर क्लिक करा.
5. जे मोबाइल नंबर तुमच्या नावावर नाहीत त्या मोबाईल क्रमांकाच्या मागे असलेल्या छोट्या बॉक्समध्ये क्लिक करुन नंतर Not My Number या शब्दावर क्लिक करा.
6. सर्व प्रक्रिया संपल्यावर SUBMIT वर क्लिक करा.
7. आपण जर Not My Number हा ऑप्शन निवडला असेल तर खालीलप्रमाणे बॉक्स येईल. त्या बॉक्समधील Request ID लिहून ठेवा.

