गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना पाणी बॉटल व बिस्किटे वाटप
गुहागर, ता. 29 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडी, युवा सेना व ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बिस्लरी पाणी बॉटल आणि बिस्किटे याचे वाटप करण्यात आले. Help for patients on Uddhav Thackeray’s birthday

यावेळी गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूनम पाष्टे, शहरप्रमुख श्री. सिद्धिविनायक जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक श्री.राजेंद्र आरेकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निलेश ढेरे, श्री.विलास नार्वेकर, शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख श्री.विश्वनाथ रहाटे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री. प्रभुनाथ देवळेकर, आरे ग्रामपंचायत सरपंच श्री. समित घाणेकर, माजी नगरसेवक श्री. सुधाकर सांगळे, महिलाआघाडी शहर संघटिका श्रीम. सारिका कनगुटकर, विभाग प्रमुख श्री. सचिन खरे, विभाग प्रमुख श्री.समीर कनगुटकर, विभाग प्रमुख श्री. विकास जाधव, वार्ड क्रमांक सातचे शाखाप्रमुख कल्पेश बागकर, ग्राहक कक्ष शहर पदाधिकारी आदेश मोर, युवासेना शहरप्रमुख श्री.राज विखारे, युवासेना, विभागप्रमुख कु.शुभम तवसाळकर आदी उपस्थित होते. Help for patients on Uddhav Thackeray’s birthday

