महिन्यातील जेमतेम १५ दिवसच सेवा
गुहागर, ता. 29 : गेले ३/४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरुन वहात आहेत. अशातच अत्यावश्यक सेवेत येणा-या भारत संचार निगम लिमिटेडची (BSNL) ची मोबाईल सेवा मात्र बंद पडल्याने ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. Out of BSNL coverage area during crisis

सध्या जवळपास सर्वांच्याच हातात मोबाईल फोन पहायला मिळतो. प्रत्येक जण याच सेवेवर अवलंबुन असतो. संकटकाळात सरकार कडुन Helpline क्रमांक दिले जातात. मात्र मोबाईलला नेटवर्कच नसेल तर मदतीसाठी कसा फोन करायचा? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. गेले ३/४ दिवस मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी दरडी कोसळत आहेत मात्र BSNL चे नेटवर्क अनेक भागात “नॉट रिचेबल” आहे. Out of BSNL coverage area during crisis
BSNL चे सार्वाधिक ग्राहक ग्रामिण भागात आहेत. खाजगी कंपन्यानी आपली 5G सेवा सूरु केली आहे मात्र BSNL अजुन 2G/3G च्या पुढे सरकताना दिसत नाही. याबद्दल कमालीची अनास्था या कंपनीत पहायला मिळते. BSNL चे मासिक रिचार्ज प्लॅन खाजगी मोबाईल कंपन्यांच्या तुलनेने खुप स्वस्त आहेत मात्र महिन्यातील जेमतेम १५ दिवस सुरळीत सेवा देणा-या या सरकारी कंपनीच्या रिचार्ज चा हिशेब खाजगी कंपन्याच्या प्लॅंन्सच्या बरोबरीनेच होतो. Out of BSNL coverage area during crisis

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष BSNL ची मोबाईल सेवा हि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने सुरळीत सेवा देता येत नाही अशी ओरड या कंपनीत नेहमीच ऐकायला मिळते. लोकप्रतिनिधी मात्र या समस्येकडे सोयिस्कर डोळेझाक करत असल्याने ग्राहक नाराज आहेत. “डिजिटल इंडिया” च्या माध्यमातुन सरकार ने ग्रामीण भागाला मोबाईल/इंटरनेट सेवेने जोडणे आवश्यक होते मात्र तसे होताना दिसत नाही. Out of BSNL coverage area during crisis
