छत्रपती युवा सेना, जिल्हाप्रमुखांनी दिले नियुक्तीपत्र
गुहागर : छत्रपती युवा सेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे दापोली तालुका अध्यक्ष म्हणून इम्तियाज बु. मुगाये, दाभोळ यांची निवड झाली आहे. हे नियुक्ती पत्र छत्रपती युवा सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रीयाज ठाकूर यांनी संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ कदम यांच्या आदेशानुसार दिले आहे. दाभोळ येथे रहाणारे इम्तियाज बु. मुगाये हे गेली अनेक वर्ष सामाजिक काम करत आहेत. या कामाची दखल घेवून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले कार्य व्हावे म्हणून छत्रपती युवा सेनाची स्थापना गणेश कदम यांनी केली. मा. खासदार संभाजीराजे हे या संस्थेचे मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या न्याय व हक्कांसाठी लढण्यासाठी ही संस्था काम करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदार, सहा आलुतेदार यांना एका छत्राखाली आणण्याचे काम केले. रयतेचे राज्य अशी स्वराज्याची ओळख निर्माण केली. त्याचप्रमाणे समाजामधील भेदभाव संपून, सर्वजण सुखाने नांदणे हे या संस्थेचे उद्दीष्ट आहे. छत्रपती युवा सेनेची ही ध्येय, धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविणे. प्रत्येक गावत छत्रपती युवा सेनेची शाखा तयार करणे. या शाखेला कार्यकर्त्यांची जोड देणे. हे काम पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे.
संस्थेला अपेक्षित कार्य करावे अशी अपेक्षा इम्तियाज बु. मुगाये यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.