• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साखरी बुद्रुकला वादळाचा तडाखा

by Mayuresh Patnakar
July 23, 2023
in Guhagar
415 4
0
साखरी बुद्रुकला वादळाचा तडाखा
816
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आईसह दोन मुले जखमी, गुहागरात मुसळधार

गुहागर, ता. 23 : तालुक्यात शनिवारी रात्री पासूनच पावसाचा जोर वाढला होता. Heavy Rain in Guhagar रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. साखरी बुद्रुक परिसराला पावसासह वादळी वार्याचा फटका बसला. या गावातील एक महिला व दोन मुले घरावरील पत्रे पडून जखमी झाली. तालुक्यातील 14 घरांचे सुमारे 6 लाख 57 हजार 410 रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

Heavy Rain in Guhagar

शनिवारी (ता.22)  रात्रीपासूनच गुहागर तालुक्यात सर्वत्र वेगवान वार्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यात तिन ठिकाणी विजेचे खांब पडले. अनेक वृक्ष उन्मळून पडले. साखरी बुद्रुक परिसरात  वादळ झाले. या वादळामुळे विकास पंढरीनाथ मोहिते यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर कोसळले. त्यावेळी सौ। प्राची मोहिते व त्यांची दोन लहान मुले घरात होती.  पत्रे व अन्य साहित्य अंगावर पडून आईसह दोन्ही मुले जखमी झाली. तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिघांची प्रकृती उत्तम असल्याने संध्याकाळी त्यांना घरी पाठवण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जांगीड यांनी सांगितले आहे.Heavy Rain in Guhagar

Heavy Rain in Guhagar

या वादळात साखरी बुद्रुक मधील हरिचंद्र नागे यांच्या गोठ्याचे 8090 रुपयांचे नुकसान झाले. दिपाली काताळकर  यांच्या घराचे 5370 रु., नंदा देवजी मोहिते यांच्या घराचे 1लाख 3 हजार 800 रु., शारदा शरद मोहिते यांच्या घराचे 1लाख 700 रु., प्रकाश तुकाराम मोहिते यांच्या घराचे 98 हजार 300 रु., कांचनी विजय मोहिते यांच्या घराचे 8 हजार रु.,  राजेश पंढरीनाथ मोहिते यांच्या घराचे 76 हजार रु., मारुती धोंडू मोहिते यांच्या घराचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.Heavy Rain in Guhagar

Heavy Rain in Guhagar

तालुक्यातील निगुंडळ बौद्ध वाडी मध्ये  विद्युत वाहिनी तारांवर झाडाची फांदी पडून दोन पोल तुटले यामध्ये बौद्धवाडीतील आनंद पवार यांच्या घराचे नुकसान झाले आहे. आंबेरे खुर्द पंचशील नगर येथेही दोन विजेचे खांब पडले.  कोंडकारुळ येथील विकेश रविंद्र ढोर्लेकर यांचा घरालगतचा संरक्षक चिरेबंदी बांध पडून अंदाजे एक लाख रुपयांपर्यंत नुकसान झालेले आहे. वेळणेश्वर येथील  वासंती अप्पा जमसुडकर यांच्या घराची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली.  पंचनाम्यात 2 लाख, 26 हजार 500 रुपयांचे नुकसान नमूद करण्यात आले आहे. पेवे येथे अरुण विठ्ठल मोहिते यांच्या घराची पडवी पडून सुमारे 16550/- रु चे नुकसान झालेले आहे. मौजे कोंडकारुळ येथील श्रीमती.नलिनी नरेश अडुरकर यांच्या घरावरती लगतचा बांध पडुन घराचे पुर्णत: नुकसान  झाले. सदरचे घर इंदिरा आवास योजनेंतर्गत  बांधलेले होते. सदरच्या घटनेचा पंचनामा सा. बां. विभागाद्वारे करण्यात येणार आहे. बंदरवाडी येथील वंदना गजानन पावरी यांच्या घरालगत असलेले झाड उन्मळून पडले. यामध्ये घराचे अंशतः नुकसान झाले आहे.Heavy Rain in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsHeavy Rain in GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यानुकसानमराठी बातम्यालोकल न्युजवादळ
Share326SendTweet204
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.