• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन

by Manoj Bavdhankar
July 23, 2023
in Guhagar
214 2
0
फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन
420
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर भाजपतर्फे विविध उपक्रम

गुहागर, ता. 23 :  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त  गुहागर तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून हा सेवा दिन साजरा केला.

रायगड येथील घडलेल्या दुर्घटनेमुळे कार्यकर्त्यांनी कोणतेही वाढदिवसाचे बॅनर लाऊ नये. वाढदिवसाचे स्वतंत्र कार्यक्रम न करता सेवा दिन म्हणून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करावा. अशा सूचना भाजप प्रदेशच्या वतीने देण्यात आल्या होत्या.

Devendra Fadnavis Birthday

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रूग्णालय गुहागर, शृंगारतळी येथील डॉ सचिन ओक यांचे हॉस्पिटल, डॉ. राजेंद्र पवार यांच्या रूग्णालयात रूग्णांना बिस्कीट पुडे देण्यात आले. तसेच कोतळूक आरोग्य उपकेंद्रात भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी वाफेचे मशीन भेट दिली. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी छत्री वाटप केले. भाजपा गुहागर तालुका वतीने हा ठिकठिकाणी सेवा दिन साजरा करताना भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष मंगेश रांगळे, रूपेश विचारे, कोतळूक शक्तीकेंद्र प्रमुख सुनिल भेकरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन भेकरे, दिपक मोरे,सुनिल आगिवले, आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. Devendra Fadnavis Birthday

गुहागर शहरातही कार्यक्रम

Devendra Fadanvis Birthday : Fruit for patients

गुहागर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील  रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आले. यावेळी शहरअध्यक्ष श्री.संगमजी मोरे भाजप शहर चे गटनेते श्री.उमेशजी भोसले शहर सचिव श्री. संतोषजी सांगळे माजी नगरसेवक श्री .गजानन वेल्हाळ माजी नगरसेवक समीर घाणेकर भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष  श्री.मंदारजी पालशेतकर महिला शहराध्यक्ष नेहाताई वराडकर श्री. मुरलीधर गोयथळे तसेच वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका उपस्थित होते. Devendra Fadnavis Birthday

ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते
Tags: Devendra Fadnavis BirthdayGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarगुहागरटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.