रानवी (आरक्षण – सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : मानसी दिलीप बने, उपसरपंच : दिनेश सदानंद बारगोडे
रानवीची निवडणूक बिनविरोध झाली. वैष्णवी विजय बारगाडे, मनाली महेंद्र कदम, मानसी दिलीप बने, दिनेश सदानंद बारगोडे, प्रणय प्रकाश बारगोडे, विनोद गोविंद चौगुले आणि मयुरी मंगेश चौगुले हे सदस्य निवडून आले आहेत.
पडवे (आरक्षण : ना. मा. प्र.)
सरपंच : मुजिब हुसैन जांभारकर, उपसरपंच : मानसी विनायक सुर्वे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : 11 सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये कौसर रज्जाक चिपळूणकर व मानसी विनायक सुर्वे हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित 9 सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये प्रभाग क्र. 1 – शहनाज अली खले, प्रभाग २ – मुजीब हुसेन जांभारकर, फारुक इक्बाल गुहागरकर, शमा जावेद माखजनकर, प्रभाग क्र. ३ – शौकत अल्लाउद्दीन जांभारकर, रफिक अ. लतिफ सारंग, नादिया इक्बाल इब्जी, प्रभाग क्र. ४ लिना शरद गडदे, राजेंद्र शंकर खातू हे सदस्य विजयी झाले.
शिर (आरक्षण – सर्वसाधारण)
सरपंच : विजय रुपाजी धोपट; उपसरपंच : अमित रघुनाथ साळवी, बिनविरोध निवड.
ग्रामपंचायत सदस्य : या गावातील 5 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये ऋतुजा अमोल आंबेकर, विजय रुपाजी धोपट, अमिषा अनंत ठोंबरे, मानसी मोहन ठोंबरे, संदेश शांताराम रावणंग या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. तर प्रभाग क्र. १ मधून रामचंद्र पांडुरंग पवार, पूर्वजा विनायक गुरव, संजना समिर मोरे आणि प्रभाग क्र. २ मधून अमित रघुनाथ साळवी हे उमेदवार मताधिक्याने निवडून आले.
अडुर (आरक्षण – ना.मा.प्र.स्त्री)
सरपंच : शैलजा हरिश्चंद्र गुरव; उपसरपंच : उमेश मधुसुदन आरस; बिनविरोध निवड
ग्रामपंचायत सदस्य : अडूर ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये सुरेश नारायण मांडवकर, अक्षता अनिल नितोरे, वैभव काशिराम जाधव, शैलजा हरिचंद्र गुरव, दिपाली दीपक झगडे, सुहासिनी सुधाकर देवळे, उमेश मधुसुदन आरस, अशोक नाना देवळे, ऋतुजा संजय हळये, तेजश्री वसंत देवळे आणि प्रभाकर गोविंद कावणकर हे उमेदवार विजयी झाले.
वेळणेश्र्वर (आरक्षण – ना.मा.प्र.)
सरपंच : चैतन्य सुधाकर धोपावकर; उपसरपंच : अमोल नारायण जामसुतकर; बिनविरोध निवड
ग्रामपंचायत सदस्य : गावाने एकत्र येवून ग्रामपंचायतीमधील सर्व उमेदवारांची निवड केली. त्यामध्ये सौ. संपदा सुधीर केळकर, दिपस्वी द्वारकानाथ कटनाक, चैतन्य सुधाकर धोपावकर, अमोल नारायण जामसुतकर, सुप्रिया उदय आरवलकर, नितीन दत्तात्रय पोळेकर, सिध्दकला विनायक पावरी, विलास धोंडू घाणेकर, मिनल वामन कळंबाटे, अमृता सतीश मोरे आणि नवनीत अशोक ठाकूर यांचा समावेश आहे.
कोंडकारुळ (आरक्षण – सर्वसाधारण)
सरपंच : निलीमा प्रताप अडूरकर; उपसरपंच : अशोक सोमा अडूरकर; बिनविरोध निवड
ग्रामपंचायत सदस्य : या गावातील तीन प्रभागांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये संदिप दगडू ढोर्लेकर, दत्ताराम विठोबा पालशेतकर, रविंद्र येशा पावरी हे निवडून आले. उर्वरित 8 ग्रामपंचायत सदस्य गावातून बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये निता हरेश ढोर्लेकर, विनायक कमळाकर पोळेकर, निलिमा प्रताप अडूरकर, अमिता ज्ञानेश्र्वर जागकर, सुषमा भिकाजी भाटकर, अशोक सोमा अडूरकर, वैष्णवी वैभव पाटील व वंदना पाम्या पावसकर यांचा समावेश आहे.
साखरी बुद्रुक (आरक्षण – सर्वसाधारण स्त्री) बिनविरोध निवड
सरपंच – पवार प्राची वैभव, उपसरपंच – संतोष काशिनाथ पवार
ग्रामपंचायत सदस्य : राजेंद्र रमेश हरचिलकर, प्राची वैभव पवार, दिपिका दिपक पवार, रेश्मा रमेश शितप आणि निकिता नंदकुमार शितप हे सदस्य बिनविरोध निवडून आले. तर प्रभाग क.२ – संतोष काशिनाथ पवार, समिर प्रमोद पेडणेकर, हे सदस्य मतदानाने निवडले गेले.
पेवे (सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : भारती भिकाजी सावरटकर, उपसरपंच : किशोर केशव चिवेलकर; निवडणूकीने निवड.
ग्रामपंचायत सदस्य : येथील ग्रामस्थांनी यावर्षी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. गावाने किशोर चिवेलकर, फरहत निसारखान सरगुरो, वैशाली विजय सैतवडेकर, सुदेश शिवराम कदम, प्रिती सुरज हरचीलकर, नुरीण मुबीन पेवेकर, भारती भिकाजी सावरटकर, वैभव सिताराम साळवी आणि संजय नारायण सावरटकर यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निश्चित केले. येथील सरपंच, उपसरपंच पदाची निवड ही बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती. मात्र बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे सरपंच, उपसरपंच पदावर एकमत होवू शकले नाही.
तळवली (आरक्षण – ना.मा.प्र.स्त्री) बिनविरोध निवडणूक
सरपंच – मयुरी महेश शिगवण; उपसरपंच – अनंत गंगाराम डावल,
ग्रामपंचायत सदस्य : या निवडणूकीत सचिन गंगाराम कळंबटे, अनंत गंगाराम डावल, सविता सदानंद शिंदे, संतोष पांडुरंग जोशी, पुर्वा सुमेश पवार, प्रतिक्षा सुदिप जाधव, सुनिल धोंडु मते, मयुरी महेश शिगवण, मानसी विलास पोफळे हे गाव पॅनेलचे उमेदवार निवडून आले.
कोळवली (सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : संतोष वसंत सावरकर, उपसरपंच : अजित बालका भुवड; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : जयश्री जीणू हुमणे, अजित बालका भुवड, प्रणिता प्रदिप वाघे, संतोष वसंत सावरकर, अमोल शांताराम वाघे आणि डिंगणकर रुशाली वसंत यांना गावाने बिनविरोध निवडून दिले.
नरवण (ना.मा.प्र.)
सरपंच : प्रविण विश्र्वनाथ वेल्हाळ, उपसरपंच : शुभांगी बाळ गोताड; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : यावेळी नरवण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात गावकऱ्यांना यश आले. गावाने संयुक्ता विशाल मोरे, सुहासिनी दत्ताराम पडवेकर, चंद्रकांत काशिनाथ आगरे, प्रविण विश्र्वनाथ वेल्हाळ, अपर्णा विनायक नाटुस्कर, गंगाराम लक्ष्मण बारगोडे, शुभांगी बाळ गोताड, ज्योती प्रकाश नाटुस्कर आणि संतोष हरी मोरे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून दिले आहे.
मळण (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : नारायण पांडुरंग गुरव; उपसरपंच : रमाकांत गंगाराम सोलकर; निवड बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : मळण गावातील 8 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 7 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये मीरा महेंद्र कोतवडेकर, नारायण पांडुरंग गुरव, रमाकांत गंगाराम सोलकर, लतिका लक्ष्मण सोलकर, मोहन गंगाराम आग्रे, अमृता विश्र्वनाथ जाधव, संध्या कृष्णा सोलकर या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. तर प्रभाग तीन मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी झालेल्या मतदानात विरेंद्र वसंत नाटुस्कर हे निवडून आले.
उमराठ (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : जनार्दन पांडुरंग आंबेकर; उपसरपंच : सुरज अरुण घाडे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. यावेळी अर्चिता अनंत गावणंग, जनार्दन पांडुरंग आंबेकर, शशीकांत सिताराम आंबेकर, सुरज अरुण घाडे, प्रज्ञा प्रकाश पवार, गुलाब विजय गावणंग आणि साधना संदिप गावणंग हे उमेदवार गावाने बिनविरोध निवडून दिले.
शिवणे (सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : मनस्वी महेंद्र ठोंबरे, उपसरपंच : सदानंद रामचंद्र जोशी; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : शारदा गोविंद जोशी, सानिका संतोष जोशी, मनस्वी महेंद ठोंबरे, सुषमा रामचंद्र रायकर, संदीप सदाशिव ठोंबरे आणि सदानंद रामचंद्र जोशी हे सदस्य बिनविरोध निवडून आले.
जामसूद (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : संतोष यशवंत सावंत; उपसरपंच : सृष्टी वैभव देवळे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : येथील निवडणूक अखेरच्या क्षणी बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यामध्ये महेश यशवंत जामसुतकर, प्रज्ञा प्रभाकर कुंभार, संतोष यशवंत सावंत, स्नेहा नरेंद्र देवळेकर, सुचिता सुनिल गमरे, सृष्टी वैभव रेवाळे आणि शैलेंद्र चंद्रकांत साळवी या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
गिमवी (आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : वैभवी विजय जाधव; उपसरपंच : महेंद्र दत्ताराम गावडे; निवड : निवडणूकीने
ग्रामपंचायत सदस्य : गाव पॅनेल विरुद्ध शिवसेना पुरस्कृत पॅनेल अशी निवडणूक झाली. यामध्ये महेंद्र दत्ताराम गावडे, प्रसाद सुभाष सोमण, नेत्रा संदिप कदम, वैभवी विजय जाधव, निवेदिता देवजी सकपाळ, प्रतिभा अनंत महाडिक, सतिश अशोक इंदुलकर, सीमा दत्ताराम घाणेकर, दिपाली दिपक सकपाळ हे सदस्य निवडून आले.
मासू (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : प्रकाश पांडुरंग भोजने, उपसरपंच : सिमरन संदिप नाचरे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : सर्व सदस्य निवडणूकीत विजयी झाले. प्रभाग क्र. १ – प्रकाश पांडुरंग भोजने, विलास देवराम जाधव, उज्ज्वला विजय भोजने, प्रभाग क्र. २ – सिमरन संदिप नाचरे, शर्मिला सुरेश आलीम, प्रभाग क्र. ३ – देवजी लक्ष्मण डिंगणकर, उज्ज्वला यशवंत नाचरे.
मुंढर (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : सुशिल पांडुरंग आग्रे, उपसरपंच : अमिषा अजित गमरे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : येथील प्रभाग क्र. ३ ची निवडून बिनविरोध झाली होती. भक्ती किरण धनावडे आणि प्रदीप कृष्णा अवेरे यांचा प्रभागातील ग्रामस्थांनी एकमुखाने ग्रामपंचायत सदस्य बनविले. तर उर्वरित दोन प्रभागातील ५ जागांसाठी निवडून झाली. त्यामध्ये प्रभाग १ – रविंद्र बाबु चिले, अमिषा अजिज गमरे, प्रभाग २ – सुशिल पांडुरंग आग्रे, प्रणिता नरेश रामाणे, दर्शना दयानंद बेलवलकर हे सदस्य विजयी झाले.
गोळेवाडी (आरक्षण : सर्वसाधारण स्त्री).
सरपंच : रेणुका सागर आग्रे, उपसरपंच : रविंद्र सुभाष गावडे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचे स्थान रिक्त आहे. येथील निवडणूक बिनविरोध झाली. त्यामध्ये समिक्षा संदिप वनये, रविंद्र पर्शुराम पवार, रेणुका सागर आग्रे, मालु धाकू सोलकर, रविंद्र सुभाष गावडे आणि विशाखा विजय गावडे हे सदस्य गावाने बिनविरोध निवडून दिले.
पालपेणे (आरक्षण : ना.मा.प्र.स्त्री)
सरपंच : योगिता योगेश पालकर, उपसरपंच : रघुनाथ देवानंद घाणेकर, निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : रघुनाथ देवानंद घाणेकर, नंदिनी नामदेव खोचाडे, कीर्ती किशोर टाणकर, सुवर्णा संतोष महाडीक, संतोष यशवंत मांडवकर, दिलीप नारायण पाष्टे, योगिता योगेश पालकर, राधिका कृष्णा पालकर, संतोष गोवर्धन पडवेकर. सर्व सदस्य बिनविरोध.
खामशेत (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : मंगेश तानाजी सोलकर,उपसरपंच : विष्णू लक्ष्मण पारदळे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : सातही सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये प्रभाग क्र. १ – दिपाली दिनेश पालकर, मंगेश तानाजी सोलकर, प्रभाग क्र. २ – सिध्दी सुहास नरळकर, अस्मिता संजय कदम, प्रभाग क्र. ३ – रमेश विठ्ठल पारदळे, विष्णू लक्ष्मण पारदळे, वर्षा वसंत माचिवले हे सदस्य विजयी झाले.
निगुंडळ (आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : दिप्ती दिपक गिजे, उपसरपंच : सुभाष गणपत गावडे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : या गावात प्रभाग १ मध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये सुभाष गणपत गावडे, मयुरेश अशोक भागवत, दिप्ती दिपक गिजे हे तीन सदस्य विजयी झाले. प्रभाग २ मधून सुवर्णा हरिचंद्र गावडे आणि मनिषा मिलिंद पवार व प्रभाग ३ मधून अंकुश तुकाराम पिलवलकर आणि शालिनी आत्माराम जांगळे हे सदस्य ग्रामस्थांनी एकमुखाने निवडले.
कोसबीवाडी (आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : अर्चना तानाजी वेले, उपसरपंच : मुलु सोना सुवरे, निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : गावाने मुलु सोना सुवरे, रेखा दिनेश वेले, प्रकाश भागा वेले, अर्चना तानाजी वेले, अनुजा अरुण वेले आणि मनोहर काशिराम कदम या ग्रामपंचायत सदस्यांना बिनविरोध निवडून दिले.
साखरी आगर (आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : दुर्वा दत्ताराम पाटील, उपसरपंच : सुदाम काशिनाथ आंबेकर, निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये दुर्वा दत्ताराम पाटील, नताशा नरेश जाक्कर, राजकुमार सुभाष माइन, अनुराधा अनंत मोरे, प्रविणा प्रविण नाटेकर, सुदाम काशिनाथ आंबरेरकर, माधवी मधुकर पाटील, नम्रता सुनील घाणेकर आणि सुरेश यशवंत कदम यांचा समावेश आहे.
कुडली (आरक्षण : ना.मा.प्र.)
सरपंच : चेतनी अभिजीत शेट्ये, उपसरपंच : संतोश नारायण पावरी, निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : या गावात प्रभाग १ मधुन पुरुषोत्तम गोकुळ पावरी हे बिनविरोध निवडून आले. तर संतोष नारायण पावरी, प्रतिक्षा राजेंद्र किल्लेकर हे मताधिक्याने निवडून आले. प्रभाग २ मध्ये चैतणी अभिजीत शेट्ये, योगिता किसन जोशी आणि नितीन शंकर गावणंक हे बिनविरोध निवडून आले. तर प्रभाग क्र. ३ मध्ये निकिता सुभाष जाधव, थोरसे अमृता चंद्रकांत हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. या प्रभागात राकेश गणपत देसाई मताधिक्याने निवडून आले.
काताळे (सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : नम्रता वसंत निवाते, उपसरपंच : प्रसाद शांताराम सुर्वे, निवड : निवडणूक
ग्रामपंचायत सदस्य : 9 सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये श्रावणी विजय नाचरे, वैभवी चंद्रकात बारस्कर आणि जैद मेहबूब भाटकर हे 3 सदस्य बिनविरोध निवडून आले. अन्य 6 जागांसाठी निवडणूकीत प्रभाग क्र. १ – प्रसाद शांताराम सुर्वे, प्रियांका निलेश सुर्वे, नम्रता वसंत निवाते, प्रभाग क्र. २ – विनायक लक्ष्मण बारस्कर, प्रभाग क्र. ३ – मधुकर कृष्णा असगोलकर, राजेश्री राजेंद्र कुळ्ये, हे सदस्य निवडून आले.
काजुर्ली (आरक्षण : सर्वसाधारण स्त्री)
सरपंच : रुक्मिनी विठ्ठल सुवरे, उपसरपंच : सुधाकर गुणाजी गोणबरे; निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : येथील ग्रामपंचायतीमध्ये सखी सचिन सावंत, रुक्मिणी विठ्ठल सुवरे आणि मेघना महेंद्र मोहिते हे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले. तर उर्वरित चार सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये प्रभाग क्र. १ – सुधाकर गुणाजी गोणबरे, प्रभाग क्र. २ – नंदकुमार बाळु धांगडे, अजित शांताराम मोहिते, प्रभाग क्र. ३ – स्नेहल संतोष गुरव, हे सदस्य मताधिक्याने निवडून आले.
पिंपर (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : उर्वी उदय मोरे, उपसरपंच : अनिल अर्जुन घाणेकर, निवड : बिनविरोध
ग्रामपंचायत सदस्य : उर्वी उदय मोरे, अंकिता अंकुश कारकर, अनिल एकनाथ मोरे, मानसी मंगेश दवंडे, अनिल अर्जुन घाणेकर, सुरेश गंगाराम काजारे, शमिका शैलश घाग. सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले.
भातगांव (आरक्षण : सर्वसाधारण)
सरपंच : सुशांत भागा मुंडेकर, उपसरपंच : रिक्त; निवड : निवडणूक
ग्रामपंचायत सदस्य : या ग्रामपंचायतीमधील ४ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये अनुष्का अजित फावरे, सखाराम लक्ष्मण पाष्टे, स्वरा संजय मुंडेकर, सुशांत भागा मुंडेकर यांचा समावेश आहे. माजी पंचायत समिती सदस्य गायत्री उदय जाधव या मताधिक्याने निवडून आल्या.