• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने केली चोरी

by Mayuresh Patnakar
February 11, 2021
in Old News
16 0
0
पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने केली चोरी
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पोलीसांना चोरीची उकल करण्यात यश, मुद्देमालही ताब्यात

गुहागर : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याची घटना 19 जानेवारीला रात्री घडली होती. या घटनेमध्ये रुपकिशोर महतो (वय 23) याला गुहागर पोलीसांनी इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली  येथून अटक केली आहे. सदर घटना घडल्यावर बेपत्ता झालेल्या किशोर महतो याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर चोरी पगाराचे पैसे न दिल्याने मालकाला अद्दल घडविण्यासाठी महतो बंधुंनी केली होती. चोरीचे पिस्टन कुठही न विकता पुणे येथे त्यांनी लपवून ठेवले होते. असे चौकशीत समोर आले आहे.
आनंद जगदाळे (रा. पेडगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी स्वमालकीचा पोकलेन अवधुत सुशील वेल्हाळ यांच्या निगुंडळ येथील खडी क्रशरवर भाड्याने दिला होता. हा पोकलेन चालविण्याचे काम किशोर महतो (मुळ गाव आंबो, ता. परखंड, जि. हजारीबाग, झारखंड) करत होता. 19 जानेवारीला (मंगळवारी) रात्री 11.30  वा. किशोर महतो दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ करुन कामगार निवासातून बेपत्ता झाला. 20 जानेवारील (बुधवारी) जगदाळेंनी खडीक्रशरवर जावून पोकलेनची पहाणी केली. तेव्हा कंट्रोल व्हिल आणि स्विंग बेरींग खोलून त्यातील जे.सी.बी. कंपनीचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याचे लक्षात आले होते. या संदर्भात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना जगदाळे यांनी त्यांचा चालक किशोर महतोवर संशय घेतला होता.
या घटनेचा तपास पोलीस अंमलदार हनुमंत नलावडे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहा.पोलीस निरीक्षक बी.के. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली  करत होते. तपासी अंमलदार हनुमंत नलावडे यांनी किशोर महतोचे मोबाईल कॉल्सची तपासणी केली. त्यामध्ये किशोरचा भाऊ रुपकिशोर महतो हा 19 जानेवारीला गुन्हा घडल्याच्या रात्री निगुंडळ परिसरात आल्याचे लक्षात आले. या माहितीवरुन गुहागर पोलीसांना रुपकिशोर महतो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे असल्याचे समजले. तपासी अमंलदार हनुमंत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील आदींनी 5 फेब्रुवारीला इस्लामपूरला जावून रुपकिशोर महतोला अटक केली. 6 फेब्रुवारीला त्याला  न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली.
यावेळी केलेल्या चौकशीमध्ये एक करुण कहाणी पोलीसांसमोर आली. किशोर महतो याला जगदाळे यांनी काही महिन्यांचा पगार दिला नव्हता. त्याचा राग किशोर महतोच्या मनात होता. ही गोष्ट त्याने भावाला सांगितली. आणि मग मालकाला अद्दल घडविण्यासाठी पोकलेनचे पार्ट काढून ठेवण्याचा कट शिजला. त्याप्रमाणे रुपकिशोर महतो निगुंडळला आला. दोघांनी पोकलन खोलून त्यातील किंमती पिस्टन काढले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीसांनी हे पिस्टन कोठे ठेवले आहेत. याची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम आणि त्यांच्या टिमने फुरसुंगीत जावून ते पितळी पिस्टन (मुद्देमाल) ताब्यात घेतला आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी किशोर महतो अजून फरार असून त्याचा शोध गुहागर पोलीस घेत आहेत.

चोरीच्या दिवशी नेमकं काय घडले ते वाचण्यासाठी लाल अक्षरातील ‘ बापरे, निगुंडळमध्ये 7 लाखाची चोरी ’ या वाक्यावर क्लिक करा.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.