समितीचा प्राथमिक अंदाज, महिनाभरात अहवाल देणार
Guhagar News, ता. 13 : शहराची भौगोलिक रचना, निसर्ग सौंदर्य, वाड्यावस्त्यांमधील दाटीवाटीने असलेल्या पुर्वांपार घरांजवळून जाणारे रस्ते आणि विकास आराखड्यातील Development Plan प्रस्तावित आरक्षणे यामध्ये काही बदल होणे आवश्यक आहे. असे मत सुनावणीसाठी आलेल्या समितीमधील सेवानिवृत्त नगररचनाकार शेखर चव्हाण यांनी व्यक्त केले. Some changes in DP is necessary.

Guhagar विकास आराखड्यावरील जनतेची मते जाणून घेण्यासाठी सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचनाकार मिलिंद गुलाबराव आवडे, सेवानिवृत्त नगर रचनाकार शिवप्रसाद आत्माराव धुपकर, सेवानिवृत्त नगररचनाकार शेखर दत्तात्रय चव्हाण आणि वास्तुविशारद प्रियदर्शन श्रीधर कोपरकर यांची समिती शासनाने नियुक्त केली होती. या समितीसमोर 1501 नागरिकांच्या हरकती व सुचनांची सुनावणी मंगळवार 11 जुलैपासून गुरुवार 13 जुलैपर्यंत सुरु होती. हे कामकाज संपल्यानंतर समिती सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Some changes in DP is necessary
यावेळी सुनावणी नंतरची प्रक्रिया सांगताना शेखर चव्हाण म्हणाले की, पुढील महिनाभरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येवून एक अहवाल तयार करु. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी गुहागर नगरपंचायत, नगररचनाकार रत्नागिरी आणि नगरविकास मंत्रालयाला पाठवला जाईल. गुहागर नगरपंचायत प्रशासन या अहवालातील नोंदीचा विचार करुन त्याबाबतच्या सूचना व बदलांचे पत्र नगर रचनाकार विभागाकडे पाठवते. त्याप्रमाणे नव्याने विकास आराखडा तयार होतो. तो आराखडा केवळ माहितीसाठी नगरपंचायत प्रसिद्ध करेल. गुहागर नगरपंचायतीकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा विकास आराखडा नगरविकास मंत्रालयात पाठवला जाईल. तेथे आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा आमचा अहवाल, नागरिकांच्या हरकती, नगरपंचायतीचे टिपण यांचा अभ्यास केला जाईल. अपवादात्मक परिस्थितीत नगरविकास मंत्रालय या विकास आराखड्यात बदल करुन पुन्हा एकदा नागरिकांना हरकती व सूचनांसाठी हा नकाशा प्रसिद्ध करतात. अन्यथा हा आराखड्याला अंतिम मंजूरी दिली जाते. Some changes in DP is necessary

मिलिंद आवडे म्हणाले की, आम्ही शासन आणि गुहागरची जनता यांच्यामधील दुवा आहोत. लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. ते शासनापर्यंत पोचविण्याचे काम आम्ही करणार आहोत. आजचा विकास आराखडा (DP) रद्द झाला तरी पुन्हा नवा विकास आराखडा बनेल. त्यालाही विरोध होईल. सुरवातीला असा खडखडाट होतोच. कोणत्याही बदलला विरोध हा ठरलेलाच आहे. परंतु जेव्हा एखाद्या विकास आराखड्यातील कामांना सुरवात होते. प्रत्यक्षात झालेला बदल लोक पहातात तेव्हा त्यांचा विरोध मावळतो. आज रत्नागिरी शहर, चिपळूण, राजापूर इथे हे आपण पाहु शकता. विकास आराखडा मंजूर झाल्यावर त्यातील पायाभुत सुविधांच्या निर्माणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडुन 100 टक्के निधी मिळतो. त्यातून शहराचा विकास वेगाने होतो. Some changes in DP is necessary
या बातम्याही वाचा
विकास आराखड्याविरोधात गुहागरकर एकवटले
गुहागर शहराचा सर्वाधिक भाग सीआरझेड व्याप्त
