• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुग्धा वैशंपायन होणार स्पृहाची सासू

by Mayuresh Patnakar
June 19, 2023
in Lifestyle
4.6k 47
0
Mugdha_n_Prathamesh

Mugdha_n_Prathamesh

9k
SHARES
25.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

(खरं तरं गुहागर न्यूज Mugdha_n_Prathamesh – आमचं ठरलयंअशा बातम्या कधी देत नाही. पण तरीही गुहागरमधील श्री दुर्गादेवी देवस्थानबरोबर आणि स्वाभाविकच गुहागरकरांबरोबर प्रथमेश लघाटे यांच असलेलं नातं, सारेगमप लिटल चॅम्पस्‌मुळे सर्वांची लाडकी झालेली मुग्धा वैशंपायन आणि नाटक, चित्रपटातील कलाकार आणि निवेदिका म्हणून सर्व परिचित सौ. स्पृहा जोशी लघाटे या नात्यामुळे एक गमतीशीर किस्सा आज गुहागर न्यूजच्या वाचकांबरोबर शेअर करत आहे.)

Mugdha_n_Prathamesh

सा रे ग म प या रिॲलिटी शो मधील Little Champs च्या पहिल्या पर्वाने अनेकजणांना वेड लावलं होतं. रामायण, महाभारत या दोन मालिकांनंतर अनेक वर्षांनी घराघरात या लहान मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम (Little Champs) कोणीच चुकवला नव्हता. प्रथमेश लघाटेला या पर्वाने मोदक असे टोपण नाव दिले.  हे सर्व लिटील चॅम्प्स आता मोठे झालेत. आता त्यापैकी काहीजणांची क्षेत्रही बदलली आहेत. मात्र काही ना काही निमित्ताने ही सर्व मंडळी टी.व्ही., न्यूज चॅनेलमधुन झळकतात आणि सर्वांना पुन्हा त्या कार्यक्रमाची आठवण करुन देतात.

यापैकी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे एकत्रितपणे गायनाचे अनेक कार्यक्रम करतात. दोघही सामाजिक माध्यमांवर सक्रीय असल्याने सातत्याने अशा कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.  त्यामुळे ते प्रितीच्या बंधनात अडकलेत अशी चर्चा गेली दिड दोन वर्ष सुरु होती.

Mugdha_n_Prathamesh

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांच्या लग्नाची गोड बातमी नुकतीच दोघांनी अधिकृतपणे जाहीर करुन टाकली. इन्स्टाग्रामवर दोघांनी टाकलेल्या आमचं ठरलयं या पोस्ट चर्चेत आल्याच, पण त्याचबरोबर नात्यांची गुंफण सांगणाऱ्या  स्पृहा जोशी (Spruha Joshi), अवधुत गुप्ते (Avdhoot Gupte), मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या संवादाने आमचं ठरलयं या पोस्टची रंगतच वाढवली.

Mugdha_n_Prathamesh1
Mugdha_n_Prathamesh

Mugdha_n_Prathamesh

ज्यावेळी प्रथमेश लघाटे ने इन्स्टावर आमचं ठरलंय अशी पोस्ट टाकली त्यावेळी या पोस्टवर  स्पृहा जोशी यांनी – वा बुवा….. वेलकम वहिनी अशी कमेंट दिली. त्यावर प्रथमेश आणि मुग्धांने धन्यवाद दिले. पण खुपते तिथे गुप्ते या शोचे निर्माता, दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांनी स्पृहाला प्रश्र्न विचारला की, मुग्धाला शुभेच्छा दिल्या पण प्रथमेशला शुभेच्छा नाही दिल्या ?

Avdhoot_Gupte
Avdhoot_Gupte

अवधुत गुप्ते यांच्या प्रश्र्नाला उत्तर देताना सौ. स्पृहा (वरद लघाटे ) म्हणाल्या की, ओह्‌ सर, ते (म्हणजे प्रथमेश) आधीच सासरे आहेत माझे.

Mugdha_n_Prathamesh
Spruha Joshi

त्यावर मुग्धा वैशंपायन यांनी पोस्ट केले की, मला जेव्हा हे कळले तेव्हा मी ही आश्चर्यचकीत झाले की म्हणजे मी सासू…….. नाही. लगेच प्रथमेश लघाटे यांनीही … हो मी सासरा आहे तिचा, अशी पोस्ट टाकली. Mugdha_n_Prathamesh

सर्वजण प्रथमेश आणि मुग्धाचे अभिनंदन करत आहेतच त्याचवेळी या संवादामुळे नवी नाती समोर आली सर्वांचेच मनोरंजनही झाले. Mugdha_n_Prathamesh

Tags: Avdhoot GupteGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMugdha VaishampayanMugdha_n_PrathameshNews in GuhagarPrathamesh LaghateSpruha Joshiआमचं ठरलयंटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share3609SendTweet2256
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.