सुभाष जाधवांच्या पुढाकाराने गिमवीत कृषी प्रशिक्षण
गुहागर, ता. 03 : गिमवी येथील ग्रामदैवत श्री खेम झोलाई देवस्थानच्या मालकीच्या शेतात नव तंत्रज्ञानाने किफायतशीर भात लागवडीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. गिमवी रहाणारे राज्य उत्पादन शुल्कचे निवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पुढाकारातून गुहागर तालुका कृषी अधिकारी यांच्याद्वारे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 45 शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. Paddy Cultivation with New Technology in Gimvi
राज्य उत्पादन शुल्क विभागातील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गिमवीत रहायला आलेले सुभाष जाधव यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरवात केली. भातशेती किफायतशील व्हावी. भाताचे उत्पादनमुल्य कमी व्हावे. यासाठी कृषी विभागाच्या मदतीने ते प्रयोग करत असतात. यावर्षी पेरणी आणि लावणीसाठी होणार खर्च आणि वाया जाणारा वेळ यांची बचत करण्यासाठी संपूर्ण शेतात भात लागवड करण्याचे प्रशिक्षण गावातील शेतकऱ्यांना देण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यासाठी गिमवी येथील ग्रामदैवत श्री खेम झोलाई देवस्थानच्या मालकीचे शेत निश्चित करण्यात आले. या शेतात दर एकादशीला संपूर्ण गाव श्रमदानातून शेती करतो. उत्पादित भाताचा वापर मंदिरात दरवर्षी होणाऱ्या गोंधळ या धार्मिक कार्यक्रमात तसेच व देव देवळात जातो त्यावेळी महाप्रसाद साठी वापरला जातो. याच शेतामध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला तर नवतंत्रज्ञानाचे फायदे आपोआप गावातील प्रत्येकापर्यंत पोचतील. असा यामागचा हेतू होता. Paddy Cultivation with New Technology in Gimvi
तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली 31 मे रोजी या शेतात 2 एकर जागेत प्रात्यक्षिके व प्रशिक्षण घेण्यात आले. दापोली कृषी विद्यापीठाने संशोधीत केलेले रत्नागिरी – 8 हे भात बियाणे आज पेरण्यात आले. सुरवातीला उपस्थित शेतकऱ्यांनी टोकन पध्दतीने भात पेरणी केली. त्यामध्ये किती वेळ जातो याची नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यापेक्षा दुप्पट जागेत ड्रमसिडरद्वारे भात पेरणी करण्यात आली. या पध्दतीत किती वेळ वाचतो, कमी मनुष्यबळात जास्त काम कसे होते. आदीची माहिती तालुका कषी अधिकारी क्षिरसागर यांनी शेतकऱ्यांना दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाला श्री खेम झोलाई देवस्थानातील मानकरी, पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला असे 45 शेतकरी उपस्थित होते. Paddy Cultivation with New Technology in Gimvi
या प्रशिक्षणासंदर्भात बोलताना सुभाष जाधव म्हणाले की, गिमवीतील ग्रामस्थ अत्यंत श्रध्देने ग्रामदैवत खेम झोलाई देवस्थानच्या शेतात काम करतात. संपूर्ण गावाचे योगदान या श्रमसेवेत असते. त्यामुळे येथील शेतात केलेल्या प्रयोगाची यशस्वीता सर्वांनाच अनुभवता येईल. मग सर्व ग्रामस्थ पुढील वर्षी असा प्रयोग आपल्या शेतात करतील. Paddy Cultivation with New Technology in Gimvi