• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धरणरस्त्यावर तिहेरी अपघात

by Mayuresh Patnakar
June 3, 2023
in Guhagar
437 4
1
Triple accident on Guhagar Chiplun highway

अपघातग्रस्त दुचाकी

858
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दुचाकीस्वार गंभीर जखमी, तिन्ही वाहनांचे नुकसान

गुहागर, ता. 03 : गुहागर चिपळूण महामार्गावरील मोडकाआगर धरण रस्त्यावर शुक्रवार (ता. 2) सायंकाळी 6.15 च्या सुमारास तिहेरी अपघात घडला. गुहागरकडे येणारा तरुण एका चारचाकीला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या चारचाकीवर आपटला. ही धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनावर आपटून दुचाकी ओव्हरटेक करत असलेल्या वाहनावर जावून आदळली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकी आणि चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. Triple accident on Guhagar Chiplun highway

Triple accident on Guhagar Chiplun highway
याच वाहनावर प्रथम आदळली दुचाकी

याबाबत अपघात स्थळावरुन मिळालेल्या माहितीप्रमाणे गुहागर शहरातील कीर्तनवाडी येथे रहाणारा सुमीत जोशी (वय 30) हा तरुण आपली दुचाकीवरुन शृंगारतळीकडून गुहागरकडे भरधाव वेगाने चालला होता. मोडकाआगर येथील खातू मसाले उद्योग बसथांबा ओलांडल्यानंतर दुचाकीस्वार त्यांच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला (महेंद्रा सुप्रिमो एम एच 08 बी यू 1383) ओव्हरटेक करत होता. इतक्यात गुहागरकडून शृंगारतळीकडे जाणारी चारचाकी (महेंद्रा बोलेरो एमएच 02 ईसी 0828) समोर आली. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराला वेग नियंत्रित करता आला नाही. समोरुन येणारा दुचाकीस्वार आपल्या वाहनावर आदळणार हे लक्षात येताच बोलेरोच्या चालकाने आपली गाडी डाव्या बाजुला घेतली. तरीही दुचाकीस्वार बोलेरोवर जावून आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की बोलेरोचे स्टेअरींग जागीच लॉक झाले. धडक दिल्यानंतर दुचाकी तेथून उडाली आणि ओव्हरटेक करत असलेल्या सुप्रिमो वाहनावर जावून आदळली. Triple accident on Guhagar Chiplun highway

या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार सुमीत जोशी यांच्या दोन्ही हातपायांना जबर दुखापत झाली आहे. वेगाने दोन वाहनांवर आपटल्याने दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. बोलेरो पिकअप या वाहनाच्या चालकाच्या बाजुच्या टायरवर दुचाकी आपटल्याने स्टेअरिंग लॉक झाले. चालकाच्या बाजुला हेडलाईट, बंपर व दरवाजा यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शृंगारतळीकडून गुहागरकडे जाणाऱ्या सुप्रिमो वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. Triple accident on Guhagar Chiplun highway

Triple accident on Guhagar Chiplun highway
ओव्हरटेक करणाऱ्या या वाहनावर आपटली दुचाकी

जखमी सुमीत जोशी या दुचाकीस्वाराला तातडीने शृंगारतळी येथील डॉ. सचिन ओक यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाची दोन बोटे तुटली होती. त्यावर कमी कालावधीत उपचार व्हावेत यासाठी शृंगारतळीत प्राथमिक उपचार करुन सुमीत जोशी याला मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्याची प्रकृती सध्या स्थीर आहे. दरम्यान सदर अपघाताची खबर अपघातग्रस्त बोलेरो पिकअपचे चालक सचिन खरे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास दिली आहे. या घटनेचा पंचनामा शनिवारी (ता. 03 जून) होणार आहे. Triple accident on Guhagar Chiplun highway

Tags: AccidentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTriple accident on Guhagar Chiplun highwayटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share343SendTweet215
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.