• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अज्ञातांनी समाधी स्थळाजवळील दान पेटी चोरली

by Mayuresh Patnakar
April 18, 2023
in Guhagar
214 2
0
अज्ञातांनी समाधी स्थळाजवळील दान पेटी चोरली

The donation box near the mausoleum was stolen

420
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुरळमधील घटना, शांतता राखण्यात पोलीस यशस्वी

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील सुरळमधील समाधी स्थळाच्या संरक्षक कठड्या लावलेली दानपेटी कठडा तोडून दानपेटीच्या सुरक्षेसाठी लावलेल्या व्यवस्थेसह अज्ञातांनी चोरली. 17 एप्रिलला रात्री विश्र्वस्तांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. शांततेचा भंग होवू नये म्हणून समाधी स्थळाला संरक्षण दिले. 18 एप्रिलच्या तपासात रिकामी दानपेटी सापडली. अज्ञातांचा उद्देश चोरीचाच होता हे लक्षात आल्यावर वातावरणातील तणाव निवळला. The donation box near the mausoleum was stolen

सुरळ गावात पाली फाट्याजवळ जंगली पीरबाबाचे समाधी स्थळ आहे. या समाधी स्थळाच्या सभोवताली मार्बल लावलेला संरक्षक कठडा आहे. या समाधी स्थळावर सर्वधर्मिय लोक दर्शनासाठी येतात. हे भाविकांना ऐच्छिक देणगी अर्पण करता यावी म्हणून संरक्षक कठड्याला एक दानपेटी बसविण्यात आली आहे. ही पेटी सहज उचलून नेता येवू नये म्हणून पेटीलाही लोखंडी सांगड्याचे संरक्षण देण्यात आले होते. The donation box near the mausoleum was stolen

बुधवार दि. 12 एप्रिल पासून ते सोमवार दि. 17 एप्रिल दरम्यान अज्ञात व्यक्तींनी समाधी स्थळाच्या सभोवताली असलेला संरक्षक कठडा तोडला. दानपेटी लोखंडी सांगड्यासह पळवली. 17 एप्रिलला ही बाब लक्षात आली. कठड्याची तोडफोड झाल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र गुहागर पोलीसांनी घटनास्थळी जावून शांतता प्रस्थापित केली. समाधी स्थळाला संरक्षण दिले. कठड्याच्या तोडफोडीबरोबरच दानपेटी बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीसांनी तातडीने श्र्वान पथक आणि बोटांचे ठसे शोधणाऱ्या पथकाला तातडीने पाचारण केले. 17 एप्रिलला रात्री उशिरा चोरीचा व धार्मिक स्थळाच्या तोडफोडीचा गुन्हा अज्ञात व्यक्तींवर दाखल करण्यात आला. The donation box near the mausoleum was stolen

मंगळवारी (ता. 18 एप्रिल) सकाळी पुन्हा एकदा पोलीसांनी तपास सुरु केला.  त्यावेळी श्र्वानपथकाने दाखविलेल्या दिशेला अधिक तपास केला असता, समाधी स्थळापासून सुमारे 100 मिटरवर एका वहाळात लोखंडी सांगड्यासह  दानपेटी सापडली. ही दानपेटी फोडून त्यातील ऐवज अज्ञातांनी चोरला होता. लोखंडी सांगडा व दानपेटी सापडल्याने अज्ञात इसमांचा हेतू केवळ चोरीचाच होता हे स्पष्ट झाले. त्यामुळे वातावरणातील तणाव निवळला. पोलीसांनी अज्ञातांविरुध्द भारतीय दंडसंविधान अधिनियम 295, 295 अ, 454, 457, 380  प्रमाणे, दानपेटी पळवणे, चोरी करणे, धार्मिक स्थळाची मोडतोड करणे असे गुन्हे नोंदविले आहेत. अधिक तपास गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करीत आहेत. The donation box near the mausoleum was stolen

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThe donation box near the mausoleum was stolenटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.