• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या विकास आराखड्याला स्थगिती मिळणार

by Mayuresh Patnakar
March 15, 2023
in Guhagar
224 2
0
Eknath Shinde

Maharashtra Chief Minister Eknath Shinde decided to adjourn the development plan of Guhagar.

440
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निलेश सुर्वे, हा शहरवासीयांच्या लढ्याचा विजय व सरकारचे आभार

Guhagar News, ता. 14 : मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरच्या शहर विकास आराखड्याला स्थगिती (Adjourn Guhagar DP) देण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्र्याच्या दालनात राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष किरण खरे व तालुकाप्रमुख नीलेश सुर्वे उपस्थित होते. हा निर्णय समजताच मुंबईत दिवसभर विविध नेत्यांच्या भेटी घेणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करुन आनंद साजरा केला. हा विजय गुहागर शहरवासीयांनी एकजुटीने उभ्या केलेल्या लढ्याचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी व्यक्त केली. Adjourn Guhagar DP

Meeting with Minister Ravindra Chavan for adjourn Guhagar DP

गुहागर शहर विकास आराखडा (Guhagar Development Plan) रद्द व्हावा म्हणून सोमवारी (ता. 13) गुहागर नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांची भेट घेतली होती. मंगळवारी (ता. 14) भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, जिल्हा माध्यम संयोजक शादुर्ल भावे, गुहागरचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, गुहागर शहर अध्यक्ष संगम मोरे, नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले, नगरसेवक समीर घाणेकर, गजानन वेल्हाळ, भाजयुमोचे शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, भाजप कार्यकर्ते हेमंत बारटक्के, अतुल फडके, प्रथमेश दामले यांनी मंत्रालयात ठाण मांडला होता.

मंगळवारी (ता. 14) सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे रत्नागिरी जिल्हा पालक रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) यांची या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी मंत्री चव्हाण यांना गुहागर शहर विकास आराखड्यामधील अनेक त्रुटी दाखवून देण्यात आल्या. जवळपास पाऊणतास ही चर्चा सुरु होती. Adjourn Guhagar DP.

Town planner showed Unsanctioned highway in DP
गुहागर : शहर विकास आराखड्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेताना गुहागर तालुक्यातील पदाधिकारी

त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांची भेट घेतली. या भेटीमध्येही शहर विकास आराखड्यामधील त्रुटी पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिल्या. Adjourn Guhagar DP.

Meeting with Minister Uday Samant for adjourn Guhagar DP

मंगळवारी (ता. 14)  सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांची भेट घेण्यात आली. सुमारे अर्धा तासांच्या बैठकीत शहर विकास आराखडा गुहागरमधील स्थानिक जनतेला कसा उध्वस्थ करणारा आहे याची माहिती देण्यात आली. या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे व तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांना सोबत घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत हा सर्व विषय पोचला होता. तसेच सोमवारी (ता. 13) रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विषयाची प्रत्यक्ष देखील केली होती.

Meeting with Minister Ravindra Chavan for adjourn Guhagar DP

या सर्व घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या काही मिनिटांच्या भेटीतच एकनाथ शिंदे यांनी सदर आराखड्याला स्थगिती देण्याबाबत पत्र तयार करण्यास सांगितले. Maharashtra Chief Minister Eknath Shinde decided to adjourn the development plan of Guhagar. अशा प्रकारे गेले दोन दिवसात गुहागर शहरवासीयांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोचविण्यात सर्व कार्यकर्ते यशस्वी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा निर्णय घेतला. Adjourn Guhagar DP

याबाबत बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालुन योग्य तो संदेश मा. मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनभावनांचा आदर केला. याबद्दल संपूर्ण गुहागर शहरवासीयांतर्फे मी त्यांचे आभार मानतो.

संबंधित बातम्या

नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभुल

नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभुल

गुहागरचा विकास आराखडा रद्द करा

युतीच्या कार्यकर्त्यांनी पोचवला गुहागरकरांचा संदेश

आम्ही युतीचे नव्हेतर जनतेचे प्रतिनिधी म्हणून भेटलो

आम्ही युतीचे नव्हेतर जनतेचे प्रतिनिधी म्हणून भेटलो

आरेकर प्रतिष्ठान तर्फे मोफत हरकत फॉर्म सुविधा

आरेकर प्रतिष्ठान तर्फे मोफत हरकत फॉर्म सुविधा

हरकती स्विकारणारा अधिकारीच अनुपस्थित

हरकती स्विकारणारा अधिकारीच अनुपस्थित

नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

ती बेंडल कुटुंबाची सामायिक जमीन

ती बेंडल कुटुंबाची सामायिक जमीन

गुहागर विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणार https://guhagarnews.com/guhagar-development-plan-3/

Tags: Adjourn Guhagar DPGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share176SendTweet110
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.