प्रवाहाची दिशा आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळे एकत्र प्रवास
Guhagar News Special Report
बागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtles) कासवांनी 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ४० ते ४५ किमीचा प्रवास ( Sea voyages of transmitter implanted turtles) केल्याची माहिती मॅन्ग्रोव्हज् फाऊंडेशनने ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. गुहा कदाचित पुन्हा अंडी घालण्यासाठी पुढील 10 दिवसांत वेळास ते गुहागरमधील समुद्रकिनाऱ्यावर येऊ शकते. असा अंदाज भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार यांनी वर्तविला आहे.
भारतीय वन्यजीव संस्था, मॅन्ग्रोव्हज् फाऊंडेशन महाराष्ट्र आणि वन विभाग-रत्नागिरी यांच्यामार्फत गेली दोन वर्ष गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले टर्टल सॅटेलाईट टॅगिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. 2022 मध्ये पाच कासवांना ट्रान्समिटर लावण्यात आले होते. 2023 मध्ये गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर 21 फेब्रुवारीला रात्री अंडी देण्यासाठी आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांना अंडी घालून झाल्यावर पकडण्यात आले. त्यांना सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविण्याचे काम भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार आणि त्यांच्या टीमने केले. त्यानंतर 22 फेब्रुवारीला सकाळी 10.00 च्या सुमारास या दोन्ही कासवांना बागेश्री आणि गुहा अशी नावे देवून समुद्रात सोडण्यात आले. Sea voyages of transmitter implanted turtles
Sea voyages of transmitter implanted turtles
बागेश्रीचा समुद्र प्रवास
22 फेब्रुवारीला समुद्रात सोडल्यानंतर बागेश्री किनाऱ्यापासून 10 किलोमिटरपर्यंत खोल समुद्रात गेली. यावेळी बागेश्रीची दिशा दाभोळकडे होती. त्यानंतर बागेश्री पुन्हा गुहागरच्या दिशेने वळली. तेथून बागेश्री आणखी 20 कि.मि. खोल समुद्रात जावून पुन्हा एकदा दाभोळ खाडीच्या मुखाशी आली. त्यानंतर मात्र तिचा प्रवास उत्तरेकडे सुरु झाला आहे. सध्या बागेश्रीचे वास्तव्य लाडघर ते मुरुड दरम्यान समुद्रकिनाऱ्यापासून 25 ते 30 कि.मि. दरम्यान आहे. Sea voyages of transmitter implanted turtles
गुहा पुन्हा किनारा शोधत्येय
गुहाच्या समुद्र प्रवासाची सुरवात दाभोळच्या दिशेने झाली. त्यानंतर गुहा पुन्हा गुहागर समुद्रकिनाऱ्यापासून 45 कि.मी. दूर खोल समुद्रात विहार करुन दाभोळकडे प्रवास करु लागली. गुहाचा पुढचा प्रवास कोळथरे, लाडघर, मुरुड, आंजर्ले असा किनाऱ्याकडे सुरु झाला. गुहा केळशीच्या समुद्रकिनाऱ्यालगत येवून पुन्हा उत्तरेकडे खोल समुद्रात गेली. श्रीवर्धनपर्यंत गेल्यानंतर गुहाचा प्रवास परत दक्षिणेकडे सुरु झाला. हरिहरेश्र्वर व वेळास दरम्यान सावित्री नदी समुद्राला मिळते त्या परिसरातून गुहा पुन्हा केळशीकडे आली आहे. Sea voyages of transmitter implanted turtles
बागेश्री आणि गुहाची दोन वेळा झाली भेट
मॅन्ग्रोव्हज् फाऊंडेशनच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर प्रकाशित झालेल्या नकाशाप्रमाणे बागेश्री आणि गुहा एकाचवेळी एकाच परिसरात दोन वेळा आढळून आल्या. 22 फेब्रुवारीला दोन्ही कासवांना समुद्रात सोडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचा मार्ग थोडा वेगळा होता पण दिशा एकच होती. वाशिष्ठी नदी अरबी समुद्राला मिळते त्या परिसरात बागेश्री आणि गुहा एकाच ठिकाणी आढळली. त्यानंतर दोघांनी काही काळ गुहागरकडे प्रवास करुन पुन्हा उत्तरेकडे मोर्चा वळवला. यावेळी खोल समुद्रात दोन्ही कासवे एकमेकांना ओलांडून प्रवास करती झाली. या प्रवासा दरम्यान बागेश्री परत एकदा दाभोळ खाडीच्या मुखाशी येवून उत्तरेकडे गेली. तर गुहा खोल समुद्रातून उत्तरेकडे मात्र किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागली. त्यावेळी बागेश्री व गुहा कोळथरे ते लाडघर दरम्यान काहीकाळ एकाच परिसरात असल्याचे आढळून आले. Sea voyages of transmitter implanted turtles
A scientist’s opinion
Sea voyages of transmitter implanted turtles बाबत बोलताना भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ आणि या उपक्रमाचे प्रमुख डॉ. आर. सुरेशकुमार म्हणाले की, दोन कासवे एकमेकांशी संवाद करतात की नाही याबाबत अजून संशोधन झालेले नाही. समुद्राच्या प्रवाहाबरोबर पोहणे, प्रवास करणे सोपे असते. त्यामुळे दोन्ही कासवे योगायोगाने एकत्र आली असावीत. समुद्री कासवांकडे समुद्रांतर्गत कोणत्याही प्रवाहासोबत किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची नैसर्गिक शक्ती असते. परंतु विणीच्या संपूर्ण हंगामात अंडी दिलेल्या परिसरात रहाण्याचा ऑलिव्ह रिडलेचा स्वभाव असावा. कारण गेल्यावर्षी सॅटेलाईट ट्रान्समिटर लावलेली कासवेही महिनाभर याच समुद्रात आढळून आली होती. याच संदर्भात आपण संशोधन करत आहोत. सातत्याने निरीक्षण केल्यानंतर या निष्कर्षाप्रत आपण पोचू.
दुसरी शक्यता आहे ती अन्नाच्या उपलब्धतेची. साधारणपणे कोणत्याही जीवाचा प्रवास हा अन्नासाठी असतो. ज्या ठिकाणी अन्नाची उपलब्धता असेल तेथे जाणे, रहाणे हा देखील निसर्गनियम आहे. त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांना आवश्यक अन्न त्या तीन ठिकाणी उपलब्ध असल्याने सॅटेलाईट ट्रान्समिटर लावलेली कासवे एकाच परिसरात आली असावीत.
गुहाचा प्रवास सातत्याने किनाऱ्यांच्या दिशेने होत आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा अंडी घालण्यासाठी योग्य समुद्रकिनाऱ्यांच्या शोधात गुहा आहे. पुढील 10 दिवसांत कदाचित गुहा पुन्हा एकदा अंडी घालण्यासाठी वेळास ते गुहागर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर येईल. अपेक्षा अशी आहे की, या १० दिवसात पुन्हा ती गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊ शकेल. आता गुहाच्या या प्रवासाची आम्हाला उत्सुकता आहे. गुहाच्या प्रवासावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमचे दोन विद्यार्थी सध्या कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचा अभ्यास करत आहेत. ती किनाऱ्याकडे सरकली तर आमचे विद्यार्थी तेथे जावून निरीक्षण नोंदवणार आहेत. Sea voyages of transmitter implanted turtles