गुहागर शहर कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात
गुहागर : गेल्या आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता हीच राजकीय उलथापालथ आ. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघात होताना दिसत आहे. गुहागर शहरातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे तोंडावर आलेल्या गुहागर नगरपंचायत निवडणुकीमुळे आ. भास्कर जाधव यांना धक्का मानला जात आहे. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group
रत्नागिरी जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार आणि एक माजी आमदार बाळासाहेबांची शिवसेना गटात सहभागी झाले आहेत. तर आ. भास्कर जाधव शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आ. जाधव यांची सेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिंदे आणि ठाकरे यांच्या या वादात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राज्यातील घडी बसविण्यासाठी गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव आक्रमकपणे उद्धव ठाकरे गटाची भूमिका मांडत आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांच्याच मतदार संघातील शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात टप्प्याटप्प्याने सामील होत आहेत. यामध्ये दिपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, रोहन भोसले यांनी किरण तथा भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गुहागर तालुकाप्रमुख म्हणून दिपक कनगुटकर यांची निवड करण्यात आली. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group

आता दिपक कनगुटकर, अमरदीप परचुरे, रोहन भोसले यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे, माजी युवासेना शहरप्रमुख राकेश साखरकर, उपशहरप्रमुख मनीष मोरे, ऍड. सुशील अवेरे, विभागप्रमुख विरेश बागकर, प्रथमेश चाफेरकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group
शहरातील प्रमुख आणि जुन्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे आगामी गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहरात कदाचित वेगळे चित्र पहावयास मिळेल. या पक्षप्रवेशानंतर शहरातील व तालुक्यातील अनेक उद्धव ठाकरे गटातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. Shivsainiks from Guhagar entered in Shinde group