नवानगरमधील घटना, कंबर आणि पाठीवरुन गेली एस.टी.
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील नवानगर मोहल्ला बसथांब्याजवळ सकाळी 10.30 च्या दरम्यान एका वृद्ध महिलेल्या अंगावरुन एस.टी. गेली. या अपघातात 65 वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली. या घटनेत पोलीसांनी एस.टी.चालकावर गुन्हा दाखल केला आहे. Elderly dies under ST
Elderly dies under ST
गुरुवारी (ता. 2) गुहागर आगारातून सुटणारी गुहागर धोपावे मार्गे वेलदूर ही एस.टी. (एमएच 14 बीटी 2970) नवानगर मोहल्ला येथे सकाळी 10.30 च्या सुमारास आली. सदर एस.टी. चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ रा. चिखली कदमवाडी वय 54 हे चालवित होते. या एस.टी.वर विजय विठ्ठल पवार रा. शृंगारतळी वय 33 हे वाहक होते. नवानगर मोहल्ला थांब्यावर एसटीतील काही प्रवासी उतरले. वेलदूर, गुहागरला जाणारे प्रवासी गाडीत बसले. त्यानंतर एस.टी. सुरु झाली. बस थांब्यापासून एस.टी. सुमारे 10 ते 15 मीटर इतकीच पुढे आली. इतक्यात नवानगर गावातून येणाऱ्या छोट्या पायवाटेवरुन मालती विठू रोहीलकर (वय 65, रा. नवानगर) ही महिला रस्त्यावर आली. प्रवाशांची चढ उतार करुन निघालेल्या एस.टी.चालकाला अचानक समोर आलेली महिला दिसलीच नाही. त्यामुळे एस.टी.ची धडक महिलेला बसली व महिला एस.टी. खाली पडली. दुर्दैवाने एस.टी.ची मागची चाके मालतीच्या कंबर व पाठीवर गेली आणि जागीच मालती रोहीलकरचा मृत्यू झाला. Elderly dies under ST

नवानगरला मालती रोहीलकर या आपल्या सुनेबरोबर रहातात. त्यांचा मुलगा मुंबईमध्ये बोटीवर कामाला आहे. तर मुलगी पालशेतला सासरी रहाते. गुरुवारी सायंकाळी चिखलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मालती रोहीलकर यांचा मृतदेह नवानगर ग्रामस्थांनी ताब्यात घेतला. Elderly dies under ST
मालती रोहीलकर या चुकणारी एस.टी. थांबविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध आल्या की त्या रस्ता ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या हे मात्र कळलेले नाही. एस.टी.च्या चाकाखाली जावून महिला ठार झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी गुहागर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. तातडीने घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लुकमान तडवी पोचले. पोलीसांनी एस.टी. चालक चंद्रकांत सकपाळ यांच्यावर भा.द.वी. कलम 304 (अ), 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Elderly dies under ST
नगरसेवक समीर घाणेकर यांची तत्परता
दरम्यान मालती रोहीलकरचा मृतदेह चिखली आरोग्य केंद्रात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था होत नव्हती. एस.टी. महामंडळाने गुहागर नगरपंचायतीकडे वैकुंठ रथाची मागणी केली. मात्र चालक अन्य कामासाठी गेल्याने वैकुंठ रथ अपघात स्थळी पोचण्यास दोन तासांचा अवधी लागणार होता. नगरसेवक समीर घाणेकर यांच्यापर्यंत ही माहिती पोचताच एस.टी.च्या गुहागर आगारातील चालकाकडे वैकुंठ रथ सोपवण्याची जुळणी घाणेकर यांनी केली. (ही बातमी तपशीलात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

