9 जण जागीच ठार, अपघातात बचावलेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
गुहागर : मुंबई- गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगावजवळील रेपोली येथे आज गुरूवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास इको कार व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. तर या अपघातात बचावलेल्या चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अपघातातील सर्व गुहागर तालुक्यातील हेदवी जुवेवाडी येथे कार्याला येत होते. Car Accident

अपघात नेमका कसा झाला हे कळू शकलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.
लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागरकडे जाणाऱ्या इको गाडी क्र. MH- 48 BT8673 यांच्यामध्ये रायगडमधील माणगावजवळ रेपोली येथे समोरासमोर धडक झाली. या अपघातात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. Car Accident

मिळालेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. माणगावजवळ रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर कारमधून प्रवास करणाऱ्या दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. रायगड पोलीस अधिक तपास करीत आहेत. इको गाडीतील सर्व मनोहर जाधव यांच्या आईच्या वर्षश्राद्धासाठी गुहागर तालुक्यातील हेदवी येथे येत होती. Car Accident

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे.
अमोल रामचंद्र जाधव (वय 40, हेदवी गुहागर तालुका), दिनेश रघुनाथ जाधव (वय 35, हेदवी गुहागर तालुका), नंदिनी निलेश पंडित (35, डावखोल संगमेश्वर तालुका), निलेश पंडीत (42, डावखोल संगमेश्वर तालुका), अनिता संतोष सावंत (55, सावंतवाडी) निशिकांत शशिकांत जाधव (23, हेदवी गुहागर तालुका), कांचन काशिनाथ शिर्के (50, आबिटगांव, ता. चिपळूण), मुद्रा निलेश पंडीत वय (12, डावखोल संगमेश्वर तालुका), लाड मामा (वय 58, डावखोल,संगमेश्वर तालुका) अशी नावे आहेत. Car Accident
दरम्यान, या अपघातात चार वर्षीय भव्य निलेश पंडित हा मुलगा वाचला होता. जखमी झालेल्या भव्य याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेताना त्याचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. Car Accident
