• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती

by Mayuresh Patnakar
December 19, 2022
in Guhagar
213 2
0
ग्रामपंचायतीचा कौल महिलांच्या हाती
419
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरमधील 14 गावात 64 टक्के मतदान

Guhagar News:  तालुक्यातील 14  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक 76.42  टक्के मतदान झोबंडी गावात झाले. तर सर्वात कमी 47.51 टक्के मतदान धोपावे गावात झाले. 14 ग्रामपंचायतींपैकी पाटपन्हाळेतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. तालुक्यातील निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात उपसरपंच पद आणि समाज हे दोन मुद्दे प्रभावी बनले होते. Gram Panchayat Election voting

गुहागर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाची निवडणूक होत आहे.  त्यामध्ये आबलोली, कौंढर काळसूर, खोडदे, चिखली, जानवळे, वरवेली, हेदवी, झोंबडी, या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर आरे ग्रामपंचायतीमध्ये 3, धोपावे (4) पांगारी तर्फे हवेली (3), आणि पाटपन्हाळेमध्ये सर्वाधिक 4 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. तसेच 21 ग्रामपंचायतींच्या 65 प्रभागांमधुन ग्रामपंचायत सदस्यांच्या 173 जागांपैकी 115 जागा बिनविरोध निवडून आल्या. 13 ग्रामपंचायतींमध्ये 58 जागांसाठी एकूण 116 उमेदवार रिंगणात आहेत.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विजयाचे गणित सोपे व्हावे म्हणून सरपंच पदाच्या उमेदवारांनी काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंच पदाचे आमिष दाखवून प्रभागातील मतदान आपल्या बाजुने खेचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता रंगली आहे. तर काही उमेदवारांनी अखेरच्या क्षणी समाजाचा आधार घेतला. हा आपल्या समाजाचा उमेदवार निवडून आला पाहिजे. समाजाने पाठीशी उभे रहावे. असे अनेक संदेश सामाजिक माध्यमांवर फिरत होते. अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी देखील सामाजिक माध्यमांचा पुरेपुर वापर केला.

निवडणुकीचा कौल महिलांच्या हाती

एकूण 21हजार 477 (महिला 11523, पुरुष 9954) मतदारांपैकी 13 हजार 782 मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिला मतदारांची संख्या 7 हजार 369  व पुरुष मतदार 6 हजार 413 अशी आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कौल महिलांच्या हाती आहे.  मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात 5 टक्क्यांनी वाढ झा

मतदान प्रक्रिया सर्वत्र सुरळीत पार पडली. कोणत्याही गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्र्न निर्माण झाला नाही. पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एका व्यक्तीने पोलीस पाटीलांना निवडणुकीच्या संदर्भाने शिवगाळ केली. मात्र त्याचा मतदानाच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही.Gram Panchayat Election voting

Gram Panchayat Election voting

आबलोलीत 65.35 टक्के मतदान

आबलोली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 6 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 3 जागांसाठी 6 उमेदवार तर सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आबलोलीमधील 793 महिला व 699 पुरुष एकूण 1492 मतदारांपैकी 975 मतदारांनी (महिला 498 व पुरुष 477 ) मतदान केले.

हेदवीत 57.30 टक्के मतदान

हेदवी ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 7 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 2 जागांसाठी 4 उमेदवार तर सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.  हेदवीमधील एकूण 1747 ( महिला 953 व पुरुष 794 ) मतदारांपैकी 1001 मतदारांनी (महिला 581 व पुरुष 420 ) मतदान केले.

पांगारी तर्फे हवेलीत 67.20  टक्के मतदान

पांगारी तर्फे हवेली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 7 जागांसाठी 15 उमेदवार तर सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 991 ( महिला 533 व पुरुष 458 ) मतदारांपैकी 666 मतदारांनी (महिला 353 व पुरुष  313) मतदान केले.

कौंढर काळसुरमध्ये 64.20 टक्के मतदान

कौंढर काळसुर ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 7 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 2 जागांसाठी 4 उमेदवार व सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1377 ( महिला 743 व पुरुष 634 ) मतदारांपैकी 884 मतदारांनी (महिला 487 व पुरुष 397) मतदान केले.

धोपावेत 47.51 टक्के मतदान

धोपावे ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध झाली. येथे सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. जनतेमधुन सरपंच निवडून देण्यासाठी 1387 (महिला 715, पुरुष 672) मतदारांपैकी 659  मतदारांनी (महिला 396 व पुरुष 263)  मतदान केले.

वरवेलीत 64.73  टक्के मतदान

वरवेली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. येथील एक जागा रिक्त रहाणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या  5 जागा बिनविरोध झाल्या असून 3 जागांसाठी 6 उमेदवार व सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1551 (महिला 832 व पुरुष 719) मतदारांपैकी 1004 मतदारांनी (महिला 512 व पुरुष 492) मतदान केले.

पाटपन्हाळेत 69.96 टक्के मतदान

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमधील 5 प्रभागातील 13 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 6 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 7 जागांसाठी 16 उमेदवार व सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी लक्ष्मी मानाई पॅनेल, गाव विकास परिवर्तन पॅनेल, पाटपन्हाळे ग्रामपंचायत परिसर विकास पॅनेल आणि मनसे पुरस्कृत पॅनेल अशी चौरंगी लढत आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण 3405 (महिला 1797 व पुरुष 1608) मतदार आहेत. त्यापैकी एकूण 2382  (महिला 1259 व पुरुष 1123 ) मतदारांनी मतदान केले.

खोदडेत 50.34 टक्के मतदान

खोडदे ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 5 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 4 जागांसाठी 8 उमेदवार व सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1478 (महिला 875 व पुरुष 603) मतदारांपैकी 744 मतदारांनी (महिला 424 व पुरुष 321 ) मतदान केले.

कोतळूक मध्ये 57.09 टक्के मतदान

कोतळूक ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 8 बिनविरोध झाल्या. सरपंच पदाची निवडणूकही बिनविरोध झाली. मात्र ग्रामपंचायत सदस्यांच्या 1 जागांसाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागातील 895 (महिला 477 व पुरुष 418) मतदारांपैकी 511 मतदारांनी (महिला 263 व पुरुष 248 ) मतदान केले.

पोमेंडी गोणवलीत 71.34 टक्के मतदान

पोमेंडी – गोणवली ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. येथील  3 प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  एकूण 1141 (महिला 612 व पुरुष 529) मतदारांपैकी 814 मतदारांनी (महिला 430 व पुरुष 384) मतदान केले.

झोंबडीत 76.42  टक्के मतदान

झोंबडी ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 7 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 2 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 5 जागांसाठी 10 उमेदवार व सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 933 (महिला 460 व पुरुष 473) मतदारांपैकी 713 मतदारांनी (महिला 359 व पुरुष 354) मतदान केले.

चिखलीमध्ये  टक्के मतदान

चिखली ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 8 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 1 जागांसाठी 2 उमेदवार व  सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1390 (महिला 741 व पुरुष 659) मतदारांपैकी 61.08 मतदारांनी (महिला 450 व पुरुष 399) मतदान केले.

आरे वाकी पिंपळवटमध्ये 66.77 टक्के मतदान

आरे ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 2 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 7 जागांसाठी 15 उमेदवार व सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 2173 (महिला 1208 व पुरुष 965) मतदारांपैकी 1451 मतदारांनी (महिला 769 व पुरुष 682 ) मतदान केले.

जानवळेमध्ये 74.42 टक्के मतदान

जानवळे ग्रामपंचायतीमधील 3 प्रभागातील 9 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 2 बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार व सरपंच पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1517 (महिला 733 व पुरुष 784) मतदारांपैकी 1129 मतदारांनी (महिला 589 व पुरुष 540 ) मतदान केले.

Tags: Gram Panchayat Election votingGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.