सचिन म्हसकर, गावाच्या विकासासाठी बांधील
Guhagar News, ता. 15 : गेली 5 वर्ष ग्रामपंचायतीचा सरपंच (Sarpanch) म्हणून काम करताना मी ग्रामविकास आघाडीचे (Gram Vikas Aghadi) प्रतिनिधीत्व केले. निवडून आल्यानंतरही कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. त्यामुळेच गावकऱ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्र्वास टाकला आणि बिनविरोध निवडून दिले. म्हणूनच मी कोण्या एका पक्षाची बांधिलकी स्विकारणार नाही. असे प्रतिपादन सचिन म्हसकर यांनी गुहागर न्यूजशी बोलताना केले. I am Sarpanch of Gram Vikas Aghadi

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधील सरपंच म्हणून निवडून आलेल्या व्यक्तींचा पक्ष लक्षात घेवून कोणत्या पक्षाचे किती सरपंच याचे वर्गीकरण गुहागर न्यूजने केले होते. ( संबंधित बातमी – 5 बीनविरोध सरपंच ठाकरे गटाचे)I am Sarpanch of Gram Vikas Aghadi
त्या बातमी संदर्भात बोलताना साखरी त्रिशुळचे सरपंच सचिन म्हसकर म्हणाले की, गेली 5 वर्ष गावाच्या विकासाची कामे करताना मी केवळ गावाची बांधिलकी स्विकारली. शासनाच्या विविध योजनांमधुन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 5 वर्षात मी कोणत्याही पक्षाचे पद स्विकारलेले नाही. गावाने माझे काम पाहून पुन्हा एकदा मला सरपंच केले. विशेष म्हणजे गेल्यावेळी मी बहुमताने सरपंच झालो यावेळी गावाने एकमताने बीनविरोध सरपंच म्हणून माझी निवड केली. गावाने दाखवलेला विश्र्वास, गावाने दिलेला सन्मान, निश्चितच मोठा आहे. त्यामुळे पुढची पाच वर्ष मी गावाच्या विकासासाठी, ग्रामस्थांना विश्र्वासात घेवून काम करणार आहे.I am Sarpanch of Gram Vikas Aghadi
