• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

by Manoj Bavdhankar
December 10, 2022
in Guhagar
83 0
0
Gram Panchayat Elections 2022
162
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या आणि 13 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या निवडणुकांवर पक्षांचा प्रभाव आहे.  महाविकास आघाडी, भाजप  बाळासाहेबांची शिवसेना युती  आणि तीन ग्रामपंचायतींमध्ये मनसे आपल्या उमेदवारांना साथ देत आहेत.  मात्र खुलेपणाने हे सरपंच पदाचे उमेदवार आमच्या पक्षाचे आहेत. असे सांगण्यास कोणताच पक्ष तयार नाही. निवडणुका झाल्यावर आम्ही ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात ते सांगू. असा सावध पवित्रा सर्व राजकीय पक्षाच्या तालुकाप्रमुखांनी घेतला आहे. Cautious posture of political parties

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

Cautious posture of political parties

या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर म्हणाले की, मविआ मध्ये कोणते उमेदवार राष्ट्रवादीचे व कोणते अन्य घटक पक्षांचे हे आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 21 ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या ते आम्ही जाहीर करु.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यामुळे मविआतील घटक पक्षांबरोबर चर्चा करुन, समन्वयाने आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो आहोत. गुहागर तालुक्यात निवडणुका होणाऱ्या 12 ग्रामपंचायतींचे सरपंच महाविकास आघाडीचेच असतील.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर म्हणाले की, युती म्हणून आम्ही एकत्रित निवडणुका लढवत आहोत. आमची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातले आहे. उर्वरीत ठिकाणी भाजपला आम्ही मदत करत आहोत.

भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, युती म्हणून एकत्र बसुन संवादाने आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहोत. सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युती म्हणून आवश्यक ते प्रयत्न तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना विश्र्वासात घेवून आम्ही करत आहोत. गाव पातळीवरील निवडणुकीत ‍अनेक छोटे मुद्दे निवडणुकीवर परिणाम करणार असतात. पक्षाच्या चिन्हावरील निवडणूक आणि गावातील निवडणूक यामध्ये बराच फरक असतो. काही वेळा स्थानिक परिस्थितीमुळे एकाच पक्षातील दोन जण एकमेकांविरोधातही निवडणूक लढवतात. अशावेळी पक्ष म्हणून अलिप्त रहाणेच योग्य असते.

गुहागरमधील ग्रामपंचायत निवडणुकाविषयी Guhagar News च्या सर्व बातम्या वाचा…

त्याला जनतेने दुसर्यांदा निवडले

गुहागरात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरु
(उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर गुहागर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींमध्ये आज काय चित्र आहे याची तपशीलात बातमी)

5 बिनविरोध सरपंच ठाकरे गटाचे

कोतळूकमधील बिनविरोधची परंपरा मोडित

Tags: Cautious posture of political partiesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.