• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूकमधील बिनविरोधची परंपरा मोडित

by Mayuresh Patnakar
December 10, 2022
in Guhagar
272 3
0
Breaking the tradition in Kotaluk

The tradition of non-opposition in Kotaluk is broken

534
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गावाच्या विरोधात जावून प्रभागात लढत

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील कोतळुक ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याच विरोधात एकाने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे कोतळुक ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा मोडीत निघाली. त्याचबरोबर बिनविरोध करण्यासाठी आग्रह धरणाऱ्यावरच निवडणुकीचा प्रचार करण्याचीही वेळ आली आहे. Breaking the tradition in Kotaluk

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

कोतळूक ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यावर तेथील तंटामुक्त समिती आणि पोलीस पाटील यांनी सर्व वाडीप्रमुख, गावातील राजकीय पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, अन्य ज्येष्ठ मंडळी यांची सभा बोलावली. या सभेत प्रभागाची रचना, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण, सरपंच पदाचे आरक्षण याविषयी चर्चा झाली. कोतळुक गावचे सरपंच पद अनुसुचित जाती, जमातीच्या महिलेसाठी आरक्षित होते. त्यामुळे त्या आरक्षणाशी संबंधित वाडीने सरपंच पदाचा उमेदवार देण्याचे ठरले. अन्य वाडी प्रमुखांनी प्रभाग निहाय उमेदवार देण्याचे निश्चित झाले. ठरलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले. गावातील दोन्ही पोलीस पाटीलांनी गुहागर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत बिनविरोध होत असल्याचे सांगितले. Breaking the tradition in Kotaluk

The tradition of non-opposition in Kotaluk is broken
The tradition of non-opposition in Kotaluk is broken

गावाने निश्चित केलेल्या उमेदवारांमध्ये कोतळूक प्रभाग 1 मधुन सर्वसाधारण प्रवर्गातून सचिन मुकुंद ओक हे उमेदवार होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सचिन ओक यांच्याविरोधात रविंद्र जनार्दन शिगवण यांनी उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरल्यावर गावातील 8 ते 10 प्रमुखांनी त्यांची भेट घेवून अर्ज मागे घेण्यास सांगितले. मात्र रविंद्र शिगवण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. कोतळुक शिगवण वाडीतील एका पुढाऱ्याने हा डाव रचुन रविंद्र शिगवण यांच्यावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दबाव आणल्याचे समोर आले. Breaking the tradition in Kotaluk

यासंदर्भात सचिन ओक यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीने निवडणुकीत कोणालाही उमेदवारी अर्ज भरण्याचा हक्क दिला आहे. मात्र ज्यावेळी बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना गावासमोर हे तथाकथित पुढारी गप्प होते. यांनी गावाला अंधारात ठेवून, माझ्याच नाहीतर गावाच्या पाठीत खंजीर खुपसला. गावाची विश्र्वासार्हता घालवली. कोतळूक प्रभाग १ मधील ग्रामस्थांवर ही निवडणूक लादण्याचे काम ज्यांनी केले त्यांना मतदानातूनच योग्य तो धडा मिळेल. Breaking the tradition in Kotaluk

स्वत:चे महत्त्व वाढवून घेण्यासाठी, कोतळूक गावाची बिनविरोधची परंपरा मोडण्याचे काम करुन या दोन चार मंडळींनी ही निवडणूक लादली आहे. मात्र त्याने गावाच्या निर्णयावर काहीही फरक पडणार नाही. (Breaking the tradition in Kotaluk)
– विलास वाघे, माजी सभापती, पंचायत समिती गुहागर

Tags: Breaking the tradition in KotalukGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share214SendTweet134
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.