• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नियम धाब्यावर बसवून दगडांची वहातूक

by Mayuresh Patnakar
December 10, 2022
in Guhagar
370 3
0
नियम धाब्यावर बसवून दगडांची वहातूक
726
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पालपेणेवासीयांनी रोखले सहा डम्पर, केली पुराव्यासह तक्रार

गुहागर, ता. 10 :  नियम धाब्यावर बसवून, बेदरकारपणे दगडांची वहातूक करणारे सहा डम्पर पालपेणेवासीयांनी शुक्रवारी अडवले. Palpene residents stopped six dumpers सर्व डम्परचे व्हिडिओ शुटींग करुन पुरावे गोळा केले. ग्रामपंचायतीने याची तक्रार जिल्हाधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिक्षक रत्नागिरी यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे. शिवाय या घटनेची तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या वेबपोर्टलवर करण्यात येणार आहे.

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे, वरवेली आणि मळण या गावांच्या सीमांवर असलेल्या स्टोन क्रशरमध्ये जेटीच्या कामासाठी आवश्यक अवाढव्य दगडांचे उत्खनन केले जाते. या दगडांची वहातूक पाटपन्हाळे, शृंगारतळी, पालपेणे मार्ग अंजनवेल येथील एल. ॲण्ड टी. कंपनीपर्यंत होते. जितक्या जास्त फेऱ्या तितके जास्त भाडे मिळत असल्याने मोकळा रस्ता मिळाला की 8 ते 10  डम्पर एका मागे एक भरधाव वेगाने जातात.Palpene residents stopped six dumpers

याच डम्पर चालकांनी पाच दिवसांपूर्वी वेगवान वहातूकीला अडथळा ठरणारी रस्त्यावरील काजुची फांदी मोडली. त्यावेळी रस्त्यावरुन वहातुक करणाऱ्या काही स्थानिकांनी डम्परवाल्यांना थांबवून रस्त्यात पडलेली फांदी उचलण्यास भाग पाडले होते.  रात्रीच्या वेळी सुरु असलेली वहातुक थांबवून ग्रामस्थांनी एकदा वाहनचालकांची तपासणी केली. तेव्हा वाहनचालक मद्य प्राशन केल्याचे समोर आले. प्रत्येकवेळी क्षमा मागून हा विषय संपत होता.Palpene residents stopped six dumpers

Palpene residents stopped six dumpers
Palpene residents stopped six dumpers : मागील बाजुस वाहन क्रमांक नसलेला डम्पर

Palpene residents stopped six dumpers

डम्पर चालकांच्या अशा बेफाम वागणुकीमुळे शुक्रवारी पालपेणेतील ग्रामस्थांनी ठरवून डम्पर रोखले. त्यावेळी डम्परच्या मागे वाहन क्रमांक नसल्याचे समोर. डम्परच्या हौद्यांचे फाळके कमी उंचीचे होते.  तरीही फाळक्याच्या उंचीपेक्षा जास्त दगड हौद्यात भरलेले होते. दगडांवर कोणतेही आच्छादन नव्हते. याविषयी डम्पर चालकांकडे विचारणा केली असता रमेश रंजन रॉय याने आम्ही याविषयी अनेकवेळा कंपनीला सांगितले मात्र कंपनी त्याकडे दुर्लक्ष करते. नोकरी असल्याने आम्ही काहीच बोलु शकत नाही. असे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायत पालपेणे यांच्याकडे रितसर तक्रार केली. या तक्रारीनंतर पालपेणेचे उपसरपंच रघुनाथ घाणेकर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह अडवलेल्या डम्परची पहाणी केली. आणि ग्रामपंचायतीमध्ये जावून इमेलद्वारे जिल्हाधिकारी रत्नागिरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी आणि पोलीस अधिक्षक रत्नागिरी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. Palpene residents stopped six dumpers

याबाबत बोलताना पालपेणेचे उपसरपंच रघुनाथ घाणेकर म्हणाले की,  बेदरकार डम्पर वहातुकीबाबत यापूर्वी गुहागरच्या तहसीलदार कार्यालयाकडे ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वी रितसर तक्रार केली होती. मात्र त्याचे उत्तरही प्रशासनाने दिलेले नाही.  म्हणूनच आज केलेले इमेल, गोळा केलेले पुरावे, तहसीलदारांना लिहिलेले पत्र, आधीच्या घटना या सगळ्याची माहिती आम्ही पीएमओ कार्यालयाला वेबपोर्टलवरुन पाठवणार आहोत. त्याशिवाय यांच्या बेदरकारपणाला लगाम बसणार नाही. रस्त्यावरुन ये जा करणारी वाहने, रस्त्याकडेला असलेल्या शाळांमध्ये जाणारी मुले यांच्यापैकी कोणालाही दुखापत झाल्यानंतर आवाज उठवून काहीच फायदा नाही. गावाच्या हिताचा विचार करुनच हे पाऊल आम्ही उचलले आहे. Palpene residents stopped six dumpers

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPalpene residents stopped six dumpersटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share290SendTweet182
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.